Guyana Indian-Origin President Irfaan Ali Dainik Gomantak
ग्लोबल

''गप्प बसा, मी तुम्हाला लेक्चर देतो''; भारतीय वंशाच्या या राष्ट्राध्याक्षांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Guyana Indian-Origin President Irfaan Ali: गुयानाचे भारतीय वंशाचे अध्यक्ष इरफान अली यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Guyana Indian-Origin President Irfaan Ali: गुयानाचे भारतीय वंशाचे अध्यक्ष इरफान अली यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पाश्चात्य मीडिया हाऊसच्या पत्रकाराला पर्यावरणाच्या मुद्द्यावर मुलाखत देत आहेत. दरम्यान, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ''पाश्चिमात्य देशांनी पर्यावरणाबाबत लेक्चर देण्याची गरज नाही. आता तुम्ही ऐका, मी तुम्हाला या विषयावर लेक्चर देतो.''

दरम्यान, पत्रकाराने अध्यक्ष इरफान अली यांना अलीकडेच सापडलेल्या तेल उत्खननाच्या मोठ्या साठ्यांबद्दल विचारले. पत्रकाराने सांगितले की, येत्या काळात खाणींमधून सुमारे 150 अब्ज डॉलर्सचे तेल काढले जाण्याची शक्यता आहे. हा एक मोठा आकडा आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होणार हे स्पष्ट आहे. याचा निश्चितच पर्यावरणावर विपरित परिणाम होऊ शकतो.

यानंतर अध्यक्ष इरफान अली म्हणाले की, ''तुम्हाला आम्हाला लेक्चर देण्याचा अधिकार आहे का? आम्हाला लेक्चर देणारे तुम्ही कोण? आता मी तुम्हाला या विषयावर लेक्चर देतो. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करणाऱ्यांसाठी तुम्ही काम करता का? तुम्हाला माहित आहे का की, गुयानामध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या एकूण क्षेत्रफळाइतके वनक्षेत्र आहे. हे असे वनक्षेत्र आहे, ज्यामध्ये 19.5 गिगाटन कार्बनचा साठा आहे आणि आम्ही ते वनक्षेत्र वाचवले आहे.''

यानंतर रिपोर्टरने विचारले की, यामुळे गुयानाला त्यांच्या इच्छेनुसार कार्बन उत्सर्जनाचा अधिकार मिळेल का? यानंतर अध्यक्ष म्हणाले की, ''तुम्हाला आम्हाला लेक्चर देण्याचा अधिकार आहे का? आम्ही जतन केलेल्या जंगलांचा तुम्ही आणि संपूर्ण जग आनंद घेत आहात. गुयानामध्ये जगातील सर्वात कमी जंगलतोड होते.'' ते पुढे म्हणाले की, 'एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलियमचे उत्पादन करुनही गुयाना हा नेट झिरो कार्बन देश राहील.'

अध्यक्ष पुढे म्हणाले की, पाश्चात्य देशांनी आम्हाला भरपाई द्यावी. गेल्या अर्ध्या शतकात जगाने निम्म्याहून अधिक जैवविविधता गमावली आहे. आम्ही आमचे पर्यावरण राखले आहे. तुम्ही कोण आहात याचे मूल्यांकन करणारे? आम्ही संरक्षित केलेल्या पर्यावरणाची किंमत विकसित देश देतील का? ते पुढे म्हणाले की, जेव्हा विकसनशील देशांना वायू आणि तेलाचे साठे सापडतात तेव्हा पाश्चात्य देशांची धाकधूक वाढते.'' गुयानाच्या अध्यक्षांनी आपल्या उत्तराने रिपोर्टरची बोलती बंद केली. त्यांच्या युक्तिवादापुढे पत्रकार असहाय्य दिसत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Goa ZP Election 2025 Live Update: साळमधील मतदान केंद्रावर तणाव; कडक पोलीस बंदोबस्त तैनात, परिस्थिती नियंत्रणात

SCROLL FOR NEXT