India Russia Relations: भारताचा रशियाला मोठा झटका! पुतीन यांच्या देशाकडून कच्चे तेल घेणार नाही; जाणून घ्या नेमंक प्रकरण

India Russia Relations: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यादरम्यान, युक्रेनसोबतच्या युद्धानंतर अनेक पाश्चात्य देशांनी रशियाशी संबंध तोडले आहेत.
Russia President Vladimir Putin
Russia President Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

India Russia Relations: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यादरम्यान, युक्रेनसोबतच्या युद्धानंतर अनेक पाश्चात्य देशांनी रशियाशी संबंध तोडले आहेत. रशियाशी व्यापारी संबंध पुन्हा पूर्ववत करण्यासाठी जगातील अनेक देशांनी नकार दिला आहे. आता भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणार नसल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारतातील सर्व रिफायनरीज आता रशियन क्रूड स्वीकारण्यास नकार देत आहेत, असे ब्लूमबर्ग न्यूजने शुक्रवारी सांगितले. रॉयटर्सने या आठवड्याच्या सुरुवातीला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज, जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग कॉम्प्लेक्सचे ऑपरेटर, अलीकडील यूएस निर्बंधांनंतर शिपर सोव्हकॉमफ्लॉट (SCF) द्वारे संचालित टँकरवर लोड केलेले रशियन तेल खरेदी करणार नाही.

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, सर्व खाजगी आणि सरकारी मालकीच्या भारतीय तेल कंपन्यांनी देशातील सर्वात मोठ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह सोव्हकॉमफ्लॉट टँकर्सद्वारे वाहून नेलेल्या रशियन क्रूडची डिलिव्हरी थांबवली आहे. सोव्हकॉमफ्लॉट किंवा इतर कोणतीही मंजूर संस्था त्यांना ऑपरेट करु शकत नाही याची खात्री करण्यासाठी तेल कंपन्या सर्व जहाजे तपासत आहेत. तपासामुळे इतर जहाजांद्वारे रशियन क्रूडच्या वितरणातही व्यत्यय आला आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या टँकरना अनेक आठवडे देशाच्या किनारपट्टीवर थांबावे लागत आहे. ते त्यांच्या मालाची डिलिव्हरी केव्हा करु शकतील याबद्दल त्यांना कोणतीही स्पष्टता मिळू शकत नाहीये.

Russia President Vladimir Putin
Russia-Ukraine War: रशियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; कीववर एकाच वेळी डागली 31 क्षेपणास्त्रे

रिलायन्स इंडस्ट्रीनेही खरेदी बंद केली

रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतातील सर्वात मोठी खाजगी तेल कंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या तेल रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ऑपरेटरने देखील सोव्हकॉमफ्लॉट टँकरद्वारे वितरित केलेले क्रूड स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे रॉयटर्सने गुरुवारी सांगितले. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रिलायन्सने आपल्या रशियन पुरवठादारांना कंपनीच्या ताफ्याचा भविष्यातील वितरणासाठी वापर न करण्याची विनंती केली आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकन सरकारने तुरुंगात बंद असलेले रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नॅव्हल्नी यांचा मृत्यू आणि युक्रेनवर चालू असलेल्या आक्रमणाला प्रतिसाद म्हणून रशियावर 500 नवीन निर्बंध जाहीर केले. निर्बंधांची घोषणा करताना, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, रशियाचे इकॉनॉमिक झोन, देशाचे संरक्षण उद्योग आणि अनेक खंडांमधील निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे.

Russia President Vladimir Putin
Russia: आम्हाला सोडवा... रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या नेपाळी तरुणांचे भारत सरकारला साकडे

भारताने रशियासोबत खरेदी कायम ठेवली होती

युक्रेनवरील आक्रमणानंतर पाश्चिमात्य देशांनी मॉस्कोवर लादलेल्या निर्बंधानंतर गेल्या दोन वर्षांत भारत रशियन क्रूडचा मोठा आयातदार म्हणून उदयास आला आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) च्या मते, भारत या वर्षी फेब्रुवारीमध्ये चीननंतर रशियन कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश राहिला. याचा अर्थ रशिया हा भारताचा सर्वोच्च कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाश्चिमात्य देशांच्या दबावानंतरही, महागाई रोखण्यासाठी भारत सरकार स्वस्त रशियन तेलावर अवलंबून आहे. गेल्या महिन्यात, ब्लूमबर्गने रिपोर्ट दिला की, भारत हा तेलाच्या बाजारपेठेतील एक प्रमुख जागतिक प्लेयर बनत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com