Querim Ponda: सफर गोव्याची! लावण्यमयी निसर्गराजीने नटलेलं, सुरश्री केसरबाई केरकरांचा पदस्पर्श लाभलेलं 'फोंडा-केरी'

Querim Ponda Goa: केसरबाई या महान गायिका. शास्त्रीय संगिताच्या उत्कृष्ट ख्याल गायिका म्हणून त्यांचं नांव देशभर झालं. देशाच्या अनेक शहरांत त्यांनी कार्यक्रम केले आणि केरी गावाला कीर्ती मिळवून दिली.
Querim Ponda
Querim PondaDainik Gomantak
Published on
Updated on

माझा गाव फोंडा तालुक्यातील केरी. इथेच माझा जन्म व बालपण. लावण्यमयी निसर्गराजीने नटलेला हा गावं. गावाचं सांस्कृतिक संचित फार मोठं. मुबलक भरपूर पाणी. पाण्याचे विविध स्रोत. तळी, झरे, विहिरी. सुरश्री केसरबाई केरकर यांचं घर याच गांवात. त्याच नावाने सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूल इथं आहे.

मुख्य म्हणजे या हायस्कूलचा दर्शनी भाग जसा अगोदर केसरबाईंच्या काळात होता तसाच ठेवला आहे. केसरबाई या महान गायिका. शास्त्रीय संगिताच्या उत्कृष्ट ख्याल गायिका म्हणून त्यांचं नांव देशभर झालं. देशाच्या अनेक शहरांत त्यांनी कार्यक्रम केले आणि केरी गावाला कीर्ती मिळवून दिली. त्यांच्या घरातील हायस्कूल इमारतीत गेल्यावर त्यांच्या रियाझाचे आलापी सूर अंगात भिनत असल्यासारखे वाटतात. या हायस्कुलच्या समोर एक विलोभनीय तळे आहे. पाणी वाढले तर रस्त्यावर येणार नाही ना असं मार्गाला लगटलेलं.

केरी गावात हनुमान मंदिर आहे. पुढं गेल्यावर श्री विजयादुर्गा संस्थान आहे. या मंदिरात अनेक कार्यक्रम होतात. निसर्गाच्या आल्हाददायक मोहक घरट्यात वसल्यासारखे हे मंदिर आहे. चित्रिकरण करण्‍यात करण्याचा कुणालाही मोह व्हावा इतकं सुंदर दृष्य. केरी गांवात अनेक महान प्रतिभावंत प्रज्ञावंत सुपुत्र होऊन गेले. फोंड्यात ज्यांचा पुतळा आहे ते दादा वैद्य यांचे घर केरी गांवात आहे. दादांनी वापरलेली अनेक आयुर्वेदीय दगडी उपकरणे तिथं पाहायला मिळतात.

Querim Ponda
Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

हे घर सुध्दा एका इतिहासाचा बोलता सचेत वाडा होय. केरी गांवात कुळागरे खूप आहेत. त्यात फेरफटका मारला तर फुफ्फुस स्वच्छ झाल्याचा अनुभव येतो. पोफळीची झाडे व इतर वनस्पती डौलात उभी असलेली दिसतात.

केरी गांवात प्राचीन शिंपण पद्धत अवलंबिली जाते हे सांगण्यात मला अभिमान दिसतो. आता तांत्रिक बदल केले आहेत ते काळाला अनुसरून. त्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी कल्लें हे लाकडी उपकरण घेऊन आम्ही झाडं शिंपत असू.

Querim Ponda
Agond: सफर गोव्याची! सृष्टीसौंदर्याने नटलेला, निसर्गाचे वरदान लाभलेला ‘आगोंद'

आता पाणी विहीरीत सोडतात आणि पंपाद्वारे स्प्रिंकलरने शिंपतात. मूळ स्रोत – तळे. ३० घरांचा वाडा ह्या तळ्याच्या पाण्यावर जगतो. खाण्यापिण्यास हेच पाणी. गांवातील लोकांचं पाण्यावर तसंच पाण्याच्या स्त्रोतांवर अफाट प्रेम आहे. सगळं व्यवस्थापन लोक बघतात. कसलंही सरकारी अनुदान न घेता तळ्याची निगा, बांधणी, उपसणे केले जाते. टीम एकत्र येऊन काम करते. नियमांचे कांटेकोरपणे पालन केलं जातं. शिस्त पाळली जाते.

माझ्या गांवाला आपला चेहरा आहे. लहानपणी आमच्याकडे गुरं होती. तो गोठा व ती वासरू, तो वेगळाच गंध व मुक्या प्राण्यांकडलं नातं जीवनात रंग आणायचं. आमची हाडे केरी गांवाने बलवान केली.

प्रा. सुभाष जाण, फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com