Sweden Flag Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: स्वीडनचा मोठा निर्णय, पाकिस्तानातील दूतावास केला बंद; 'आम्हाला आमच्या लोकांचे...'

Sweden: युरोपीय देश स्वीडनने पाकिस्तानमधील आपला दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे.

Manish Jadhav

Sweden: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त आहे.

यातच, युरोपीय देश स्वीडनने पाकिस्तानमधील आपला दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. संकटग्रस्त पाकिस्तानमधील सध्याच्या "सुरक्षा परिस्थिती"मुळे स्वीडनने दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा केली आहे.

मात्र, दूतावासाने धोक्याचे स्वरुप स्पष्ट केले नाही. शाहबाज सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानमधील राजकीय स्थिती सतत बिघडत चालली आहे.

सरन्यायाधीशांच्या विविध खटल्यांसाठी त्यांच्या पसंतीचे पॅनेल तयार करण्याच्या अधिकारांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने एक विधेयक रद्द करण्याच्या याचिकेवर पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत आहे.

दुसरीकडे, इस्लामाबादमधील (Islamabad) सध्याच्या सुरक्षेच्या परिस्थितीमुळे, स्वीडनचे दूतावास अनिश्चित काळासाठी बंद आहे, असे दूतावासाच्या वेबसाइटवरील नोटीसमध्ये म्हटले आहे.

मायग्रेशन विभाग सध्या अशा कोणत्याही विनंत्या हाताळण्यास सक्षम नाही. त्यात पुढे म्हटले आहे की, "तसेच आम्ही आमच्या कौन्सुल, गेरी एस. किंवा तुमच्या घरच्या पत्त्यावर कोणतीही कागदपत्रे पाठवू शकत नाही." तथापि, आमचे अर्जदार आणि कर्मचारी सदस्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.''

नोटीसमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, मिशन पुन्हा सुरु करण्याबाबत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर या क्षणी दिले जाऊ शकत नाही. हा निर्णय स्वीडनमध्ये नुकत्याच घडलेल्या कुराण जाळण्याच्या घटनेशी संबंधित असल्याचे अनेकांचे मत आहे.

एका डॅनिश-स्वीडिश अतिउजव्या अतिरेक्याने 21 जानेवारी रोजी स्वीडिश पोलिसांच्या संरक्षणाखाली स्टॉकहोममधील तुर्की दूतावासासमोर कुराणाची प्रत जाळली होती.

त्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पदच्युत पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यासह पाकिस्तानातील अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता.

दुसरीकडे, स्वीडिश दूतावास बंद झाल्यामुळे परदेशी पाकिस्तानी आणि विद्यार्थी अडचणीत आले आहेत. स्वीडनमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःची नोंदणी केली आहे ते त्यांचे शुल्क भरण्यास असमर्थ आहेत.

एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, इस्लामाबादमधील दूतावास बंद झाल्यामुळे, परदेशात राहणारे पाकिस्तानी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत नाहीत. राजनैतिक सूत्रांनी सांगितले की, स्वीडिश व्हिसा जारी करण्यासाठी सहसा चार ते सहा महिने लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT