Pakistan: पाकिस्तानात खळबळ, PM शरीफ यांच्या निवासस्थानी सापडला संशयित अफगाणी

Pakistan Prime Minister Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी एक अफगाण संशयित घुसल्याने गोंधळ उडाला.
 Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Prime Minister Shehbaz Sharif: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी एक अफगाण संशयित घुसल्याने गोंधळ उडाला. यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणाही चकित झाल्या आहेत.

पंतप्रधानांच्या निवासस्थानासह पाकिस्तानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही संशयास्पद व्यक्ती तिथे कशी पोहोचली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हा संशयित पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी कसा घुसला. शनिवारी सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना संशयित कोठून आला हे माहित नव्हते.

संशयिताला इस्लामाबाद (Islamabad) पोलिसांच्या काउंटर टेररिझम विभागाने (CTD) ताबडतोब ताब्यात घेतले असून त्याला अज्ञात स्थळी हलवले आहे.

 Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानसमोर नवं संकट, 3 वर्षात फेडावे लागणार इतके परकीय कर्ज; दिवाळखोरी...!

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार सूत्रांनी सांगितले की संशयिताने अफगाणिस्तानचा रहिवासी असल्याचा दावा केला आहे आणि तो तीन वेगवेगळ्या मार्गांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला होता.

सीटीडी, पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संशयिताची चौकशी करत आहेत, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सुरक्षा यंत्रणांनी संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून तो पंतप्रधानांच्या निवासस्थानात कसा घुसला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Railway Fare: पाकिस्तान रेल्वे रावळपिंडी ते लाहोर पर्यंत किती शुल्क आकारते? जाणून तुम्हीही म्हणाल...

संशयित कोणत्या उद्देशाने आला होता

पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी ज्या संशयित अफगाणीला ताब्यात घेतले आहे, तो कोणत्या उद्देशाने पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. तो हल्ला करणार होता का? अफगाणिस्तानातून हा संशयित पीएम आवासमध्ये विना रोखठोक कसा आला, जिथे सुरक्षा दलांचा कडक बंदोबस्त असतो. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com