Khyber Pakhtunkhwa Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: खैबर पख्तुनख्वा पाकिस्तानच्या हातातून निसटणार! दहशतवाद्यांसमोर...

दैनिक गोमन्तक

Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच, अफगाण सीमेजवळील पाकिस्तानच्या अनेक भागात परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दहशतवादी कारवाया इतक्या वाढल्या आहेत की, तेथील सुरक्षा दलही हतबल दिसत आहेत. खैबर पख्तुनख्वामध्ये परिस्थिती अधिक वाईट आहे, जिथे भूतकाळात दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

अल अरेबिया पोस्टच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेवरील प्रांतांवर दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे पाकिस्तान निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे आणि सुरक्षेच्या मुद्द्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.

अल अरबिया पोस्ट या मिडल इस्ट न्यूज ऑर्गनायझेशननुसार, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून इतर अनेक दहशतवादी गटांना चांगलीच संधी मिळाली आहे. तालिबानने त्यांना पाकिस्तानमध्ये दहशतवादी (Terrorists) कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. 28 नोव्हेंबर रोजी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने इस्लामाबादसोबतच्या शांतता चर्चेतून माघार घेतली. तेव्हापासून पाक रेजर्संबरोबर खैबर पख्तूनख्वामध्ये नियमित चकमकी होत आहेत.

दुसरीकडे, अल अरेबिया पोस्टच्या अहवालात असेही म्हटले आहे की, पाकिस्तानने 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून अफगाणिस्तानमधील इस्लामिक जिहादला उघडपणे समर्थन दिले, हीच पाकिस्तानची चूक ठरली. अतिरेकी धार्मिक विचारसरणीला मान्यता दिल्याने आपल्याच प्रदेशावर आणि नागरिकांवर परिणाम होईल याची त्याला कल्पना नव्हती. अहवालात पुढे म्हटले आहे की, पाकिस्तान अफगाणिस्तानातील (Afghanistan) अपयशावरुन आंतरराष्ट्रीय लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दहशतवादाचा बळी ठरला असल्याचे भासवत आहे.

दरम्यान, पाकिस्तानला प्रत्येक गोष्टीसाठी पाठिंबा देणारा चीन आता केवळ अफगाणिस्तानच्या संसाधनांचा वापर आणि शोषण करण्यातच रस दाखवत आहे. तर, मानवतावादी संकटाच्या परिस्थितीबद्दल चीन मौन आणि अनभिज्ञ आहे. गेल्या वर्षभरात, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP), गुल बहादूर गट, इस्लामिक स्टेट-खोरासान आणि इतर अनेकांनी केपी प्रांतात किमान 165 दहशतवादी हल्ले केले, जे 2020 पेक्षा जास्त आहेत. अल अरेबिया पोस्टच्या रिपोर्टनुसार, या सर्व हल्ल्यांपैकी 115 हल्ले टीटीपीने केले आहेत.

गेल्या आठवड्यात 18 डिसेंबर रोजी, खैबर पख्तुनख्वाच्या बन्नू जिल्ह्यातील सुरक्षा कंपाऊंड यांना टीटीपीशी संबंधित दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. त्यावर हा धक्कादायक हल्ला असल्याचे पाक पंतप्रधानांनी म्हटले होते. ते म्हणाले होते की, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी यशस्वी कारवाई केली आहे. त्याचबरोबर, कॉम्प्लेक्सवर कब्जा केलेल्या सर्व दहशतवाद्यांना ठार मारले आहे. तर, प्रतिबंधित पाकिस्तानी तालिबान (TTP) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

त्याचप्रमाणे, 20 डिसेंबर रोजी, टीटीपी दहशतवाद्यांनी दक्षिण वझिरीस्तानमधील वाना येथील पोलीस ठाण्यात जबरदस्तीने प्रवेश करुन शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा लुटला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT