Muhammad Ali Jinnah  Dainik Gomantak
ग्लोबल

वाह रे बहाद्दर! चोरांनी चक्क मोहम्मद अली जिनांचा चष्माच पळवला

पाकिस्तानात गरिबी एवढी वाढली आहे की, चोरट्यांनी चक्क देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांनाही सोडलेले नाही.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानला (Pakistan) आधीच कोरोना संकटाने घेरलेले असताना दुसरीकडे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. यातच आता पाकिस्तानात गरिबी एवढी वाढली आहे की, चोरट्यांनी चक्क देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांनाही सोडलेले नाही. अरई न्यूजच्या वृत्तानुसार, चोरट्यांनी वेहारी उपायुक्त कार्यालयाच्या आत लावलेल्या पाकिस्तानच्या कायद-ए-आझम मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah Glasses) यांच्या पुतळ्याचा चष्मा चोरला आहे. चोरीची ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली. डिप्टी कमिश्नर परिसरात काही अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यानंतर, संधी मिळताच कायद-ए-आझम यांच्या पुतळ्याचा चष्मा घेऊन पळून गेले.

दरम्यान, चष्मा चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी या घटनेची दखल घेत मुलतानच्या (Multan) आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. या घटनेने उस्मान बुजदार (Usman Bujdar) चांगलेच संतापले. या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उस्मान बुजदार यांनीही जिना यांच्या पुतळ्यावर लावलेला जिना चष्मा (Jinnah Glasses Stole) पुन्हा लावण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

सप्टेंबरमध्ये जिनांचा पुतळा उडवण्यात आला होता

पाकिस्तानच्या संस्थापकाच्या पुतळ्यासह अशी घटना समोर आलेली ही पहिलीच घटना नाही. याआधी, सप्टेंबरच्या उत्तरार्धात, शेजारच्या बलुचिस्तान प्रांतातील (Balochistan province) ग्वादरमध्ये बॉम्बस्फोटात जिना यांचा पुतळा उडवण्यात आला होता. ही घटना बलुच दहशतवाद्यांनी (Baloch militants) घडवून आणली होती. ग्वादरमधील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हवर जिनांचा पुतळा बसवण्यात आला होता. जूनमध्ये हा पुतळा बसवण्यात आला होता आणि सप्टेंबरमध्ये स्फोटकांनी तो उडवला गेला होता.

2013 मध्ये जिना वापरत असलेल्या इमारतीला आग लागली होती

त्याचवेळी पाकिस्तानने बंदी घातलेल्या बलुच रिपब्लिकन आर्मी (Baloch Republican Army) या दहशतवादी संघटनेने बॉम्बने पुतळा उडवून देण्याची जबाबदारी घेतली आहे. बलुच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बब्बर बलोच (Babgar Baloch) यांनी ट्विटरवर स्फोटाची कबुली दिली आहे. त्याच वेळी, 2013 मध्ये बलूच दहशतवाद्यांनी जिना यांनी वापरलेल्या 121 वर्षे जुन्या इमारतीला स्फोटकांनी उडवले होते. त्यामुळे तेथे आग लागली, जी तब्बल चार तास धुमसत राहिली. त्यामुळे फर्निचर व स्मृतीचिन्ह जळून राख झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT