Comets Dainik Gomantak
ग्लोबल

महाकाय धूमकेतू पृथ्वीला देणार टक्कर?

यूएस स्पेस एजन्सी नासाने (NASA) एक मोठा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून रिकॉर्ड पातळीवर शोधला आहे.

दैनिक गोमन्तक

यूएस स्पेस एजन्सी नासाने (NASA) एक मोठा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून रिकॉर्ड पातळीवर शोधला आहे. त्याचे बर्फाळ केंद्रक सूर्याजवळ सापडलेल्या धूमकेतूंपेक्षा लाखो पटीने मोठे आहे. विशेष म्हणजे हा धूमकेतू 80 मैल पसरलेला आहे. तर त्याचे वस्तुमान सुमारे 500 ट्रिलियन टन असल्याचे मानले जाते आहे. (The US space agency NASA has discovered a large comet near Earth at record levels)

नासाने (NASA) म्हटलयं की, ''या धूमकेतूचे नाव C/2014 UN271 (Bernardinelli-Bernstein) आहे. या धूमकेतूचा वेग ताशी 22,000 मैल असून तो सूर्यमालेच्या बाजून त्याच्या केंद्राकडे वेगाने जात आहे. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पृथ्वी (Earth) आहे. अशा स्थितीत तो पृथ्वीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तथापि, या धूमकेतूबद्दल आपल्याला घाबरण्याची गरज नाही, कारण आपण यापासून पूर्णपणे सुरक्षित आहोत.''

वास्तविक, तो सूर्यापासून एक अब्ज मैल दूर जाणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या निघून जाण्याची घटना 2031 पूर्वी होणार नाही. अशा परिस्थितीत या धूमकेतूपासून पृथ्वी पूर्णपणे सुरक्षित आहे. नोव्हेंबर 2010 मध्ये या धूमकेतूची पहिली नोंद झाली होती. त्या काळात तो सूर्यापासून तीन अब्ज मैलांच्या अंतरावर होता. तेव्हापासून संशोधक या धूमकेतूवर लक्ष ठेवून त्याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अवकाशात आणि पृथ्वीवर असलेल्या दुर्बिणींची मदत घेतली जात आहे. धूमकेतूंच्या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी (Scientists) नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर केला आहे. याद्वारे धूमकेतूचा आकार निश्चित करण्यात आला. तर दुसरीकडे शास्रज्ञांनी तर्क लावला आहे की, कदाचित धूमकेतू खूप मोठा असावा, कारण सूर्यापासून इतक्या लांब अंतरावरही तो इतका सक्रिय होता. मात्र हबल दुर्बिणीद्वारे या वर्षी त्याबाबत अधिक माहिती मिळाली.

शास्त्रज्ञांनी म्हटलयं की, ''हा धूमकेतू अब्जावधी वर्षे जुना आहे. याद्वारे आपल्याला आपल्या सूर्यमालेच्या सुरुवातीच्या दिवसांची माहिती मिळते. हे आपल्या सूर्यमालेतील सर्वात दूर असलेल्या ऊर्ट क्लाउडमधून दिसून आले आहे. धूमकेतू गेल्या दहा लाख वर्षांपासून सूर्याच्या दिशेने सरकत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT