रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या राजधानी कीवसह अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. यातच आता ओडेसाचे गव्हर्नर म्हणाले की, 'युक्रेनियन सैन्याने बुधवारी ब्लॅक सी (Black Sea) मध्ये मॉस्क्वा या रशियन युद्धनौकेचे क्षेपणास्त्र हल्ल्यात नुकसान केले आहे.' गव्हर्नर मॅक्सिम मार्चेंको यांनी टेलिग्रामवर लिहिले, "ब्लॅक सी चे रक्षण करणाऱ्या नेपच्यून क्षेपणास्त्रांमुळे रशियन जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे." रशियाच्या (Russia) संरक्षण मंत्रालयाने युद्धनौकेचे नुकसान झाल्याची पुष्टी केली आहे. मात्र, सर्व क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचा दावाही रशियाने केला आहे.
युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच म्हणाले की, "रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटचे प्रमुख मॉसव्का यांच्यासाठी एक आश्चर्य."
"ते जहाज आतापर्यंत जळत आहे. या जहाजामध्ये 510 क्रू सदस्य होते," असे ते YouTube प्रसारणादरम्यान म्हणाले. त्याचवेळी ते पुढे असेही म्हणाले की, 'नेमकं काय झालं आहे ते आम्हाला समजत नाही.'
दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, 'Mosvka क्षेपणास्त्र क्रुझरला आग लागली त्यानंतर मोठा स्फोट झाला. "Mosvka क्षेपणास्त्र क्रूझरला आग लागल्याने दारुगोळ्याचा स्फोट झाला. जहाजाचे गंभीर नुकसान झाले," असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सर्व क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे, आगीच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
स्पुतनिक या वृत्तसंस्थेनुसार, सुरुवातीला "स्लावा" नावाचे जहाज मायकोलायव्हमध्ये 1976 मध्ये ठेवण्यात आले होते आणि 1983 मध्ये कमीशन करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.