Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

"अजिबात खरं नाही": अमेरिकेने फेटाळला इम्रान खान यांनी केलेला दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा सभापतींचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिलाय. यातच आता अमेरिकेने (America) पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे आरोप फेटाळले आहेत. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 'अमेरिका विरोधी पक्षांच्या मदतीने त्यांचे सरकार पाडू इच्छित आहे. हे दावे अजिबात खरे नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.' दुसरीकडे, इम्रान खान यांनी दावा केला आहे की, 'सरकारच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव हा स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे "परकीय कारस्थान" चा परिणाम आहे. त्याचवेळी आम्हाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी परदेशी निधीचा वापर केला जात आहे.' शुक्रवारी राष्ट्राला संबोधित करताना, 69 वर्षीय पंतप्रधानांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करत म्हटले की, 'एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने पाकिस्तानमध्ये शासन बदलण्याची धमकी दिली होती.' (The US rejects Imran Khan's foreign conspiracy claim)

दरम्यान, इम्रान खान यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अमेरिकेच्या उप परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या जालिना पोर्टर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "मला अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे की, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही पाकिस्तानच्या घटनात्मक प्रक्रियेचा आदर करतो. परंतु त्यांच्याकडून करण्यात आलेले आरोप अजिबात खरे नाहीत."

तसेच, एका माजी वरिष्ठ पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याने पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथून टाकण्याच्या कथित "परकीय कट" चा तपास करण्यासाठी आणि तथाकथित "धमकीच्या पत्र" ची वस्तुस्थिती उघड करण्यासाठी फेडरल मंत्रिमंडळाने स्थापन केलेल्या आयोगाची नियुक्ती केली आहे.

याशिवाय, पाकिस्तानचे माहिती तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी शुक्रवारी सांगितले की, ''मंत्रिमंडळाने लेफ्टनंट जनरल (Retired) तारिक खान यांच्या अध्यक्षतेखालील एक आयोग स्थापन केला आहे, ज्याचा उद्देश सत्ता परिवर्तनाचा धोका आहे की नाही हे शोधणे आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT