इम्रान खान आज पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार?

पाकिस्तान संसदेमध्ये आज इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका बसला असला तरी यादरम्यान देशात राजकीय गोंधळ सुरूच आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संसदेमध्ये आज इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. (Pakistan PM Imran Khan to face no-confidence vote today)

Imran Khan
रशियाला G20 मधून बाहेर काढणे सोपे नाही

दरम्यान, इम्रानने अविश्वास ठरावाद्वारे विरोधकांच्या एकजुटीला बगल देत शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचा निर्धार केला. इमरान खान (Imran Khan) म्हणाले की, माझा देशाला संदेश आहे की, मी नेहमीच शेवटच्या चेंडूपर्यंत पाकिस्तानसाठी लढलो आणि लढत राहीन.

दरम्यान, विरोधकांनी देशभरात मोर्चे काढण्याचे नियोजन केले आहे. विरोधक इस्लामाबादमध्ये एक रॅलीही काढू शकतात. नवाझ शरीफ लंडनमधून आभासी माध्यमातून पाकिस्तानच्या (Pakistan) जनतेला संबोधित करतील, असे मानले जात आहे.

नवाझ शरीफ सक्रिय
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता संसदेमध्ये इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी सक्रिय झाले आहेत. त्यांच्या एका रॅलीत लंडनमधून (London) आभासी माध्यमातून देशाला संबोधित करण्याची योजना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल शरीफ यांनी एमक्यूएम नेते खालिद सिद्दीकी यांना फोन करून अभिनंदन केले. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत.

Imran Khan
हाफिज सईदला 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, पाकिस्तानी न्यायालयाचा मोठा निर्णय

शाहबाज होऊ शकतात पुढील पंतप्रधान
शनिवारी संसदेमध्ये अविश्वास ठरावावर मतदान झाल्यानंतर इम्रान सरकारचे पतन निश्चित मानले जात आहे. वास्तविक, 342 खासदारांच्या संसदेत बहुमताचा आकडा 172 आहे. विरोधी पक्षाचे 199 खासदार आहेत. अशा परिस्थितीत पीपीपी आणि पीएमएल-एन यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी सत्तेत येण्याची खात्री आहे. पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ हे नव्या सरकारमध्ये पंतप्रधान होऊ शकतात.

शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ असून सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत. ते 2008 ते 2018 पर्यंत पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या राजवटीत 1999 मध्ये सौदी अरेबियात हद्दपार झाले होते. शरीफ यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि 7 अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com