US Embassy Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचे केले आवाहन

रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक सैनिक आणि अवजड शस्त्रे तैनात केली आहेत, त्यामुळे रशिया (Russia) युक्रेनवर कधीही हल्ला करु शकतो.

दैनिक गोमन्तक

रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक सैनिक आणि अवजड शस्त्रे तैनात केली आहेत, त्यामुळे रशिया (Russia) युक्रेनवर कधीही हल्ला करु शकतो, अशी शक्यता अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी व्यक्त केली आहे. (The US Embassy Called On Its Citizens In Ukraine To leave The Country As Soon As Possible)

दरम्यान, कधीही युद्ध सुरु होण्याची शक्यता व्यक्त करत युक्रेनमधील (Ukraine) अमेरिकन दूतावासाने बुधवारी माजी सोव्हिएत देशातील आपल्या नागरिकांना लवकरात लवकर निघून जाण्याचे आवाहन केले. दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, "यूएस दूतावासाने युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांना व्यावसायिक किंवा इतर खाजगीरित्या उपलब्ध वाहतूक पर्यायांचा वापर करुन शक्य तितक्या लवकर निघण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे."

तसेच, याआधी मंगळवारी अमेरिकेचे (America) अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियाने युक्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. "मी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आधीच स्पष्ट केले आहे की, जर रशियाने युक्रेनमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना गंभीर आर्थिक निर्बंधांसह परिणामांना सामोरे जावे लागेल." एवढेच नाही तर पूर्वेकडील प्रदेशात (Poland, Romania etc.) अमेरिकन सैन्याची आणि नाटोची उपस्थिती वाढवण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही.

शिवाय, दोन दिवसांपूर्वी अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने कीवमधील त्यांच्या राजनयिकांच्या कुटुंबीयांना रशियाच्या संभाव्य आक्रमणाच्या चिंतेने युक्रेन सोडण्यास सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT