Paris: मनी लाँड्रिंग अन् मानवी तस्करी प्रकरणात 10 पाकिस्तानी गजाआड !

मनी लाँड्रिंग (Money laundering), मानवी तस्करी आणि बनावट कागदपत्रांच्या संशयावरुन पॅरिसच्या उपनगरातून 10 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
Arrested
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

मनी लाँड्रिंग, मानवी तस्करी आणि बनावट कागदपत्रांच्या संशयावरुन पॅरिसच्या उपनगरातून 10 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना 10 पैकी दोन भाऊ हे नेटवर्क चालवत असल्याचा संशय आहे. या प्रकरणामुळे पाकिस्तानातून (Pakistan) अवैध स्थलांतर आणि मनी लाँड्रिंगसंबंधी (Money Laundering) यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. 10 (Pakistani Nationals Arrested In Paris For Money Laundering And Human Trafficking)

दरम्यान, 2020 मध्ये तुर्की आणि ग्रीस मार्गे पाकिस्तानात बनावट युरोपियन कागदपत्रांसह संशयास्पद पॅकेजेसची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हे नेटवर्क उघडकीस आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट दस्तऐवजांमध्ये पासपोर्ट, ओळखपत्र आणि फ्रान्सच्या (France) निवास परवान्यासह इतर अधिकृत कागदपत्रांचा समावेश आहे.

Arrested
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सापडले नव्या वादात

शिवाय, तपासात, फ्रेंच अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायात गुंतलेल्या 20 अधिकृत असलेल्या कंपन्यांचाही शोध घेतला, ज्या टॅक्सी कंपन्यांच्या मोठ्या नेटवर्कशी जोडल्या गेल्या होत्या. खोट्या कागदपत्रांद्वारे उघडलेल्या सुमारे 200 बँक खात्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या 10 लोकांच्या घरातून आणि कार्यालयातून 157 बनावट ओळखपत्रे, 1,34,000 युरो रोख, एका मासेरातीसह चार वाहने जप्त केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com