Karnataka Muslim Girls Dainik Gomantak
ग्लोबल

हिजाबच्या वादात तालिबानची एन्ट्री, निषेध करणाऱ्या मुलींना दिला पाठिंबा

कर्नाटकातील (Karnataka) मुस्लिम मुलींचे कौतुक करताना तालिबानने म्हटले की, 'या मुली इस्लामिक मूल्यांसाठी झगडत आहेत.'

दैनिक गोमन्तक

कर्नाटकातील हिजाबचा वाद थांबण्याचे नावच घेत नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तरी राजकीय नेते या मुद्यावरुन एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान, हिजाबच्या वादात तालिबाननेही उडी घेतली आहे. हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या मुस्लिम मुलींना त्यांनी पाठिंबा दिला आहे. कर्नाटकातील (Karnataka) मुस्लिम मुलींचे कौतुक करताना तालिबानने (Taliban) म्हटले की, 'या मुली इस्लामिक मूल्यांसाठी झगडत आहेत.' (The Taliban Said Muslim Girls In Karnataka Were Fighting For Islamic Values)

दरम्यान, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) इस्लामिक अमिरातीचे प्रवक्ते इनामुल्ला समंगानी यांनी ट्विट करत म्हटले की, "हिजाबसाठी भारतीय मुस्लिम मुलींचा संघर्ष हे दर्शवितो की हिजाब ही केवळ अरब, इराण (Iran) आणि पाकिस्तानची (Pakistan) संस्कृती नसून एक इस्लामिक मूल्य आहे." ज्यासाठी जगभरातील मुस्लिम मुली वेगवेगळ्या प्रकारे बलिदान देतात आणि त्यांच्या धार्मिक मूल्याचे रक्षण करतात.

बुरखा घातलेल्या मुलीचे कौतुक

कर्नाटकातील एका मुलीचा बुरखा घातलेला फोटोही सामानानी यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. अल्लाहू अकबर बोलताना या मुलीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या बुरख्यामधील मुलीचे अनेक वरिष्ठ तालिबान अधिकाऱ्यांकडून कौतुक होत असल्याचे त्यांनी सांगितले. बुरख्यासाठी लढणाऱ्या या मुलींना तालिबान पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी तालिबानच्या प्रवक्त्याने पाकिस्तानच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी यूजरने लिहिले की, कर्नाटकातील मुस्लिम मुली धर्मनिरपेक्षतेसाठी लढत आहेत. ज्यानंतर सामागानी लिहिले की, ते बनावट धर्मनिरपेक्षतावादी आहेत, कारण ते हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या मुलींना सेक्युलर म्हणत इस्लामशी वैर दाखवत आहेत.

अफगाण महिलांनी हिजाबला विरोध केला

तालिबानने सत्तेत येताच महिलांना हिजाब घालणे अनिवार्य केले. त्याचबरोबर महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करत तालिबानने महिला कलाकारांना टीव्ही शोमध्ये काम करण्यापासून रोखले आहे. त्यांनी महिलांना नेहमी बुरख्यामध्ये ठेवण्याचा आदेश दिला. यानंतर अफगाणिस्तानातील अनेक महिलांनी हिजाबच्या नियमाला विरोध केला.

कर्नाटकात 1 जानेवारीपासून हिजाबवरुन वाद सुरु झाला आहे. जेव्हा एका शैक्षणिक संस्थेत 6 मुस्लिम मुलींना हिजाब परिधान करण्यास नकार देण्यात आला. कॉलेज व्यवस्थापनाने हिजाब घालणे कॉलेजच्या ड्रेस नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणाला वेग आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT