Pakistan Arif Alvi  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: राष्ट्रपतींनी घेतली अचानक सुट्टी, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी ढकलला पुढे

पाकिस्तानच्या (Pakistan) नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या (Pakistan) नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. कारण पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी (Arif Alvi) सोमवारी अचानक रजेवर गेले. ‘प्रकृती अस्वस्थतेमुळे’ त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी शपथविधी सोहळा पार पडणार होता.

ARY न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मंत्रिमंडळ मंगळवार किंवा बुधवारीही शपथ घेऊ शकते. पाकिस्तान (Pakistan) मुस्लिम लीग नवाजचे 14 मंत्री आणि पीपीपीचे 11 सदस्य पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असतील.

यापूर्वी, देशाचे 23 वे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तासांपूर्वी डॉ अल्वी आजारी पडले. राष्ट्रपतींच्या ट्विटनुसार, डॉक्टरांनी त्यांची सविस्तर तपासणी केली असून त्यांना काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे.” यानंतर राष्ट्रपती अल्वी कोणतीही माहिती न देता सोमवारी रजेवर गेले.

त्याचवेळी, अशीही बातमी समोर येत आहे की, पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी नवीन मंत्रिमंडळातील सदस्यांना पदाची शपथ देण्यास नकार दिल्यानंतर आता सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी मंगळवारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

'जिओ टीव्ही' च्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळातील सदस्य सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 वाजता शपथ घेणार होते, मात्र पंतप्रधान कार्यालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी संपर्क साधला असता अल्वी यांनी त्यांना शपथ देण्यास नकार दिला.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आता सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांना मंगळवारी हंगामी अध्यक्ष म्हणून नवीन मंत्रिमंडळाला शपथ देण्यासाठी सभागृहात बोलावण्यात येणार आहे. अध्यक्ष अल्वी आजारी पडल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही गेल्या आठवड्यात संजरानी यांनी पदाची शपथ दिली होती. अल्वी हे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे सदस्य आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT