Brooklyn Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेतील ब्रुकलिन शहरात गोळीबार, स्फोटके जप्त: अहवाल

अमेरिकेतील ब्रुकलिन शहरातील सबवे स्टेशनवर गोळीबार झाला असून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेमधील (America) ब्रुकलिन शहरातील सबवे स्टेशनवर झालेल्या गोळीबारामुळे मंगळवारी एकच खळबळ उडाली. वृत्तानुसार, स्टेशनवर स्फोटकेही सापडली आहेत. लोकांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये प्रवाशांचे रक्ताने माखलेले कपडे दिसत आहेत. हल्ल्याच्या ठिकाणी स्फोटकेही सापडल्याचे इतर काही वृत्तांमध्ये म्हटले आहे. सकाळच्या सर्वात वर्दळीच्या वेळी ही घटना घडली आहे.

दरम्यान, न्यूयॉर्क पोलिसांनी (Police) ट्विट करत स्पष्ट केलयं की, "तपासणीसाठी ब्रुकलिनमधील 36 व्या स्ट्रीट आणि 4th एवेन्‍यू भागात जाणे टाळा." एका सोशल मीडिया यूजर्सने, सबवेचा व्हिडिओ ट्विट केला आहे, जिथे गोळीबार झाला. व्हिडिओमध्ये धूर निघताना दिसू येत आहे.

याशिवाय, हा दहशतवादी हल्ला होता की नाही याची अद्याप प्रशासनाने पुष्टी केलेली नाही. सोशल मीडियावरील काही फोटोंमध्ये ब्रुकलिनमधील सबवेवर रक्त पडलेले दिसून येत आहे. अनेक ट्विटर युजर्संनी हा दहशतवादी हल्ला असू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. NY1 नुसार, संशयिताने बांधकाम कामगाराचा गणवेश परिधान केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT