Chile Fire Dainik Gomantak
ग्लोबल

Chile Fire: चिलीमध्ये शतकातील सर्वात भीषण आग, शेकडो लोकांचा मृत्यू; राष्ट्रपतींनी आणीबाणी केली जाहीर

Chile Fire: चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीचा घातक परिणाम होत आहे. चिलीमधील 100 हून अधिक जंगलांना लागलेल्या आगीचा हवामानावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Manish Jadhav

Chile Fire: चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीचा घातक परिणाम होत आहे. चिलीमधील 100 हून अधिक जंगलांना लागलेल्या आगीचा हवामानावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आगीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो बेपत्ता असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती म्हणाले की, देश एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. चिलीच्या किनारी शहरांमध्ये धुराचे लोट पसरल्याने आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लागलेल्या जंगलातील आगीमुळे विना डेल मार आणि वालपरिसोच्या बाहेरील भागांना धोका आहे. ही दोन्ही किनारी शहरे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कॉन्सेप्शियन विद्यापीठातील संशोधक फ्रान्सिस्को डे ला बॅरेरा म्हणाले की, 2017 मध्ये, ज्वाळांनी चिलीमधील (Chile) एक शहर नष्ट केले आणि 11 लोकांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्ये लागलेल्या आगीत 10 लाख एकरपेक्षा जास्त जंगल जळून खाक झाले आणि दोन डझन लोकांचा जीव गेला होता.

आग कोणी लागली, एवढी भीषण कशी झाली?

आता चिली या शतकातील सर्वात प्राणघातक वणव्याचा सामना करत आहे. राजधानी सँटियागोच्या वायव्येकडील मध्य चिलीच्या वालपेराइसो प्रदेशातील दाट लोकवस्तीच्या भागात आग लागल्याने सुमारे 112 लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण अमेरिकेतील आग मानवानेच लावली असावी, अशी शक्यता आहे, मात्र उष्मा आणि दुष्काळामुळे आगीने मोठे रुप धारण केले आहे.

कोलंबियामध्ये आगीला आपत्ती घोषित करण्यात आली

संशोधनानुसार, पर्वतीय वाऱ्यांनी ही आग किनारी भागात खालच्या दिशेने ढकलली, त्यामुळे लोकवस्तीच्या भागात जास्त उष्णता आहे. त्यामुळे उत्तर दक्षिण अमेरिकेतील तापमानात विक्रमी वाढ झाली असून, त्याचा परिणाम कोलंबियापर्यंत पोहोचला आहे. आगीमुळे, कोलंबिया सरकारने (Government) नुकतीच आग आपत्ती घोषित केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT