China Economy: चीनी अर्थव्यवस्थेला घरघर, शेअर मार्केट पडलं थंड; 3 वर्षात 6 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

China Share Market: चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. चीनी अर्थव्यवस्थेला (China Economy) मंदीचा सामना करावा लागत आहे.
Indian Share Market| Nifty Fifty
Indian Share Market| Nifty FiftyDainik Gomantak

China Economy: चीन सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. चीनी अर्थव्यवस्थेला (China Economy) मंदीचा सामना करावा लागत आहे. तरुणांच्या हाती रोजगार नाही. रिअल इस्टेट क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या बाहेर पडत आहेत आणि सर्वात वाईट स्थिती शेअर बाजाराची (China Share Market) आहे. चीनच्या शेअर बाजारात सध्या मोठं संकट निर्माण झालं आहे. या आठवड्यात चीनचा शेअर बाजार शांघाय कंपोझिट इंडेक्स 6.2 टक्क्यांनी घसरला. ऑक्टोबर 2018 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. तर शेन्झेन कंपोझिट इंडेक्स 8.1 टक्क्यांनी घसरला, जी 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून हे इंडेक्स अनुक्रमे 8 टक्के आणि 15 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

3 वर्षात 6 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

गेल्या तीन वर्षांत चिनी शेअर बाजारातून $6 ट्रिलियनचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, चिनी अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावणाऱ्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये विक्रमी घसरण होत आहे. तरुणांची उच्च बेरोजगारी, चलनवाढ आणि जन्मदरात तीव्र घट यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार, चीनचा जीडीपी वाढीचा दर यावर्षी 4.6 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. ही दशकांतील सर्वात कमकुवत कामगिरी असेल. त्याचवेळी, 2028 पर्यंत ते 3.5 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

Indian Share Market| Nifty Fifty
China Economy: चीनला मोठा झटका! जीडीपी वाढीचा रेट मंदावला, फिच रेटिंग एजन्सीचा दावा

हा आठवडा चिनी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट होता

चीनसाठी हा आठवडा अत्यंत वाईट ठरला. आठवड्याची सुरुवात जगातील आणि चीनमधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी एव्हरग्रेन्डेला विकण्याची वेळ आली. हाँगकाँगच्या कोर्टाने एव्हरग्रेन्डेचे लिक्विडेशन करण्याचे आदेश दिले होते. हा जगातील सर्वात मोठा प्रॉपर्टी डेव्हलपर आहे. त्यामुळे चीनमधील रिअल इस्टेटचे संकट अधिक गडद झाले आहे. एवढेच नाही तर रिअल इस्टेटच्या संकटामुळे चीनच्या बँकिंग उद्योगावरही संकटांचा डोंगर कोसळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com