Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: संघर्ष थांबत नाहीये! गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 13 लोकांचा मृत्यू; बायडन म्हणाले...

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी हमासने इस्रायलसोबत युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता.

Manish Jadhav

Israel Hamas War:

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी हमासने इस्रायलसोबत युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या युद्धविरामाच्या अटी नाकारल्यानंतर आणि दक्षिण गाझा शहरावर हल्ले वाढवण्याचे वचन दिल्यानंतर गाझा पट्टीतील रफाह येथे इस्रायली हवाई हल्ल्यात किमान 13 लोक ठार झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईचे वर्णन ‘अविश्वसनीय’ असे केले आहे.

इस्रायलच्या हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, युद्धविरामासाठी इस्रायल आणि हमास यांच्यावर सतत दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गाझामध्ये होत असलेल्या कारवाया अत्यंत टोकाच्या आहेत, असा माझा विश्वास आहे.'

गाझाची निम्मी लोकसंख्या राफाह येथे आली

गाझामधील निम्म्याहून अधिक लोक इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्या रफाह शहरात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, इजिप्तची बरीचशी सीमा प्रतिबंधित आहे आणि मानवतावादी मदतीसाठी हा मुख्य प्रवेश बिंदू आहे. इजिप्तने चेतावणी दिली आहे की, येथे कोणतीही जमीनी कारवाई किंवा सीमा ओलांडून मोठ्या प्रमाणात विस्थापन झाल्यास इस्रायलसोबतचा 40 वर्षांचा शांतता करार मोडला जाईल.

आतापर्यंत 27 हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे

कुवैती रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये दोन महिला आणि पाच मुलांसह किमान 13 लोक ठार झाले आहेत. चार महिन्यांत इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांमध्ये 27,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. इस्रायली हल्ल्यांमुळे बहुतेक लोकांना घरे सोडावी लागली.

असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, ''आमचे पहिले आणि प्रमुख लक्ष्य हमासचा नायनाट करणे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हमासच्या बटालियनला उखडून टाकण्याची गरज आहे. आजपर्यंत आम्ही 24 पैकी 17 बटालियन पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. उर्वरित बटालियनपैकी बहुतेक दक्षिण गाझा आणि रफाह येथे आहेत. आम्ही लवकरच त्यांच्यावर लष्करी कारवाई करणार आहोत.'' मात्र नेतन्याहू यांना त्यांच्याच घरात विरोध होत आहे. लोक त्यांच्या सरकारवर टीका करत आहेत आणि युद्ध संपवण्याची मागणी करत आहेत. इस्रायली ओलीसांच्या कुटुंबीयांनी रविवारी तेल अवीवमधील संरक्षण मंत्रालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी ओलिसांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली.

दुसरीकडे, इस्रायली लष्कर हमासच्या दहशतवाद्यांच्या तसेच हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करत आहे. यावेळी आयडीएफने हिजबुल्लाच्या निरीक्षण चौक्या आणि लष्करी कमांड सेंटरला लक्ष्य करुन हवाई हल्ले केले. इस्त्रायली सैन्य दक्षिण गाझामधील रफाहमध्येही हल्ले करत आहे. राफाहमध्ये इस्रायलच्या (Israel) रॉकेट हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत, तर अनेक इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याचा बळी जात असल्याने येथील लोकांनी युद्ध बंद करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT