Ceasefire efforts are fruitless! War in Gaza continues, 150 Palestinians dead in 24 hours:
हमासने कायमस्वरूपी युद्धबंदीच्या नवीन प्रस्तावांवर विचार केल्यानंतरही गाझामध्ये तणाव कायम आहे. खान युनूसच्या दक्षिण गाझा शहरात सर्वात भीषण लढाई सुरू आहे. येथील बोगद्यांमध्ये हमासचे कमांडर लपले असल्याची भीती इस्रायली लष्कराला वाटत आहे. या बोगद्यांमध्ये पाणी टाकून इस्त्रायली सैन्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तर गाझा येथील शाळेवर हल्ला करणाऱ्या हमासच्या १५ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा इस्रायली लष्कराने नुकताच केला.
गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत गाझामधील विविध भागात इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये 150 पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 313 जण जखमी झाले आहेत.
या मृत्यूंमुळे इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 26,900 झाली आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. त्याच वेळी, इस्रायली सैन्याने बुधवारी सांगितले की त्यांनी उत्तर गाझामध्ये मंगळवारी 15 हून अधिक हमास दहशतवाद्यांना ठार केले आणि एका शाळेतील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट केल्या.
इस्त्रायल लष्कराने नोव्हेंबरच्या मध्यात शतीवर आपले नियंत्रण असल्याचे सांगितले होते. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धामुळे गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे 85 टक्के लोक बेघर झाले आहेत आणि इतर भागांमध्ये स्थलांतरित होण्यास भाग पाडले आहे. एक चतुर्थांश लोकसंख्या उपासमारीने मरत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.