Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता गाझामधून मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायली एजंटनी वेस्ट बँकमधील एका रुग्णालयावर छापा टाकून तीन पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना ठार केले. इस्रायली एजंटनी मंगळवारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेशात ही कारवाई केली. इस्रायली लष्कराने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. हे आरोग्य केंद्र जेनिन शहरात असून त्याला हमासचा दहशतवादी सेल बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी, पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, आरोग्य केंद्रांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत संरक्षण देण्याची मागणीही केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र महासभा, आंतरराष्ट्रीय संस्था आणि मानवाधिकार संघटनांना इस्रायलच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रुग्णालयात घडलेल्या या घटनेचे वर्णन ''अत्यंत रानटी'' असे केले आहे. याला मानवतेविरुद्ध गुन्हाही म्हटले आहे. पॅलेस्टिनी मंत्रालयाने ट्विट केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सशस्त्र लोक आणि महिला दिसत आहेत. हे लोक वैद्यकीय पथक आणि सामान्य नागरिक म्हणून रुग्णालयात आले. इस्त्रायली एजंट व्हीलचेअर प्रॉप्स म्हणून काम करत होते. रुग्णालयाचे संचालक नाजी नाझल यांनी सांगितले की, इस्त्रायली सैन्याच्या एका गटाने इथे घुसून काही लोकांना ठार केले. विशेष म्हणजे, त्यांनी सायलेन्सर बसवलेल्या शस्त्रांचा वापर केला.
दुसरीकडे, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनेने गझवी बंधूंना आपले लढवय्ये असल्याचा दावा केला आहे. तर, जालमना हा सशस्त्र शाखेचा कमांडर होता. इस्रायली लष्कराने आरोप केला आहे की, हे तिघे दहशतवादी होते जे रुग्णालयात लपले होते. जालमना हा अनेक विशिष्ट दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे लष्कराने म्हटले आहे. तो गोळीबारात वापरण्यासाठी शस्त्रे आणि दारुगोळा वितरित करण्यासाठी ओळखला जात असे. भविष्यात तो हल्ला करण्याचा कट आखत होता आणि लपण्याची जागा म्हणून रुग्णालयाचा वापर करत होता, असेही निवेदनात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.