Relationship

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

लव्ह मॅटरच विचित्र कनेक्शन! पोरीची बापाच्या मित्रासोबत 'रासलीला' अन्...

द सनच्या वृत्तानुसार, 24 वर्षीय मुलीने ब्रिटिश डेटाइम टीव्ही शो 'दिस मॉर्निंग' च्या फोन-इन सेक्शनमध्ये डियर डेडरेला (Dear Dedre) आपल्या प्रेमाबद्दल सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

प्रेम करायला कोणतही वयाचं बंधन नसत, अन् कोणत्याही प्रकारची मर्यादाही नसते. कधी कधी अशा नात्याबद्दल ऐकायला मिळते, ज्यावर आपला विश्वासही बसत नाही. असंच पहिल्यांदा प्रेम आणि नंतर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. द सनच्या वृत्तानुसार, 24 वर्षीय मुलीने ब्रिटिश (England) डेटाइम टीव्ही शो 'दिस मॉर्निंग' च्या फोन-इन सेक्शनमध्ये डियर डेडरेला (Dear Dedre) आपल्या प्रेमाबद्दल सांगितले आहे.

24 वर्षीय मुलगी वडिलांच्या मित्राच्या प्रेमात पडली

24 वर्षीय तरुणीने सांगितले की, मी माझ्या वडिलांच्या मित्राला (51) 'अंकल' म्हणून हाक मारायची आणि लहानपणापासून त्यांना ओळखतही होते. दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मी वडिलांच्या मित्राच्या घरी गेली होती. आम्ही दोघेही वडिलांना सरप्राईज पार्टी देण्याची तयारी करत होतो. बर्थडे पार्टीच्या (Birthday party) तयारीदरम्यान एक वेळ अशी आली की, आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ आलो.

किचनमध्ये शारीरिक संबंध ठेवले

दरम्यान आम्ही दोघेही किचनमध्ये असताना शारीरिक संबंध ठेवले. या घटनेनंतर आमच्यामध्ये चांगली समजूतही निर्माण झाली होती, असं यावेळी बोलताना मुलीने सांगितले. मुलीने पुढे सांगितले की, आमचे नाते केवळ शारीरिक संबंधापुरते मर्यादित नव्हते, तर आम्ही दोघेही एकमेकांची काळजी करत असे.

मुलीला वडीलांची भिती सतावतेय

दुसरीकडे मुलीला रिलेशनशिपमध्ये (Relationship) आल्यामुळे वडिलांची भीती सतावत आहे. मला माहिती आहे की, 'जेव्हा आमच्या नात्याबद्दल त्यांना समजेल तेव्हा त्यांना खूप राग येईल. तसेच ते आम्हाला सहजासहजी स्वीकारणार नाहीत.'

वडिलांच्या मित्रासोबत भविष्य पाहतेय मुलगी

तिने पुढे सांगितले की, 'मी आणि माझा प्रियकर एकमेकांना आनंदी ठेवतो'. परंतु जेव्हा मी त्याच्याशी नातं पुढे नेण्याबद्दल बोलते तेव्हा मात्र तो प्रश्न टाळू लागतो. मुलीने पुढे सांगितले की, त्याच्या या स्वभावामुळे मी चिंताक्रांत असते.

नात्यात या अडचणी येतात

तेव्ही ती म्हणाली, 'परंतु आता मला कळले आहे की, माझ्या वडिलांचा मित्र इतरही महिलांशी बोलत आहे. या संदर्भात मला उत्तर देण्याची गरज नाही. मात्र तो म्हणतो, मी वाटेल त्याला भेटून बोलू शकतो.

मुलीने व्यक्त केली चिंता

मुलगी पुढे म्हणाली, 'आम्ही या नात्याबद्दल उघडपणे बोलू शकत नाही, आम्हाला कसे वाटते हे एकमेकांना सांगता येत नाही. मात्र त्याचे इतर महिलांशी बोलणे चालूच आहे, मात्र जेव्हा कळते तेव्हा मात्र मला त्रास होतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT