चीनचा जमीन सीमा कायदा 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. शेजारील देशाने गेल्या वर्षीच त्याला मान्यता दिली होती. पूर्व लडाखमध्ये भारतासोबत तणावाची परिस्थिती असताना चीनने हा कायदा लागू केला आहे. एवढेच नाही तर चीनने (China) अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांचे नामांतर करून आपल्या राजदूताने भारतातील अनेक नेत्यांना देशात राहणाऱ्या तिबेट समुदायाच्या लोकांच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात चीनच्या या कायद्याचा भारताशी (India) असलेल्या संबंधावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया
चीनचा जमीन सीमा कायदा
चीनच्या (China) नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने हा कायदा मंजूर केला आहे. यात चीनच्या जमीन सीमेचे रक्षण कारणे आणि त्यावरील अतिक्रमण रोखण्याचे म्हटले आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, कायद्यानुसार "चीनची अखडता आणि सार्वभौमत्व पवित्र आणि अपरिहार्य आहे" कोणीही अतिक्रमण करू नये, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारने सीमा सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक विकास हाती घेणे आवश्यक आहे, असे कायद्यात नमूद केले आहे. याशिवाय पायाभूत सुविधा मजबूत करणे, सीमेवरील लोकांचे जीवन सुसह्य करणे आणि लोकसंख्येचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
चीनने हा नवा कायदा का केला तयार
या कायदाचा परिणाम भारताशी (India) असलेल्या संबंधावर होणार असे वॉशिंग्टनमधील ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटच्या चायना सेंटरमधून डॉक्टरेक्ट करत असलेल्या शुक्सियान लिओ यांनी नोव्हेंबरमध्ये लिहिले होते,की गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीनमध्ये सीमेच्या मुद्द्यावरून तणावाची स्थिती आहे. यामुळे चीनला आपल्या ताब्यातील भागात परिस्थिती मजबूत करायची आहे. इकच नाही तर मध्य आशियाला लागून असलेल्या सीमेबाबतही चीनला काळजी वाटत असल्याच त्यांच म्हणणं आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबान अनियंत्रित झाले असून त्यांच्या भागात घुसखोरी दहशतवाद यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे वाटते. याशिवाय देशांतर्गत राजकारणात आपली प्रतिमा मजबूत करण्यासाठी शी जिनपिंग यांनी असे पाऊल उचलले आहे.
चीनचा नवा कायदा भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो?
या कायद्यामध्ये भारताचा उल्लेख नाही, पण त्याचा परिणाम नक्कीच होईल. चीन आणि भारताची 3488 किमी लांबीची सीमा आहे आणि त्यावरून वाद सुरु आहे. चीनचा 22,457 किमी लांबीच्या सीमा आहेत आणि त्या 14 देशांशी सामायिक आहेत. भारताव्यतिरिक्त चीनची 477 किमीची सीमा भुतानशी आहे आणि त्यावरून वाद सुरु आहेत. पूर्व लडाखमधील वाद सोडवण्यासाठी चीन आता चर्चेच्या मार्गाबाहेर जाऊ शकतो की, या नव्या कायदयाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांच्या कोर्स कमांडर्समध्ये चर्चा झाली होती.तेव्हा भारताने आशा व्यक्त केली होती कि चिनी सैन्याने हॉट स्प्रिंग्समधून माघार घेतली होती, परंतु ती आतापर्यंत झालेली नाही. इतकेच नाही तर या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदनही जरी करण्यात आले नाही.
भारताच्या चीनसोबतच्या संबंधावर काय परिनाम होईल?
या कायदयानुसार भारत आणि चीनमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे काही परराष्ट्र धोरण तज्ज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर काही लोकांचे म्हणणे आहे कि, कायद्याऐवजी चीनच्या या कृतीमुळे दोन्ही देशांमधील संबंधावर परिणाम होईल. सीमेवर चीन आक्रमक झाल्यास त्याचा दोन्ही देशांच्या संबंधांवर नक्कीच परिणाम होईल. पण केवळ कायद्यामुळे असे होण्याची शक्यता नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.