Marijuana Dainik Gomantak
ग्लोबल

थायलंड ठरला 'गांजा'ला कायदेशीर दर्जा देणारा आशियातील पहिला देश

थायलंड (Thailand) हा गांजाची लागवड, विक्री आणि वापर कायदेशीर करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

थायलंड हा गांजाची लागवड, विक्री आणि वापर कायदेशीर करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे. जानेवारी 2022 पासून यावर वाटाघाटी सुरु होत्या, ज्याला आता सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. सरकारने बंदी घातलेल्या प्रतिबंधित ड्रग्‍सच्या यादीतून गांजा काढून टाकला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार देशभरात एक दशलक्ष गांजाच्या बिया पाठवण्याची योजना आखत आहे. (Thailand Becomes The First Asian Country To Decriminalize Marijuana)

गांजा थायलंडला कोरोनापासून वाचवेल?

मुख्यतः पर्यटनावर (Tourism) अवलंबून असलेले देश, जसे की थायलंड, कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत थायलंड सरकार हे नुकसान भरुन काढण्यासाठी विविध योजनांवर काम करत असून गांजाबाबतचा सरकारचा (Government) हा निर्णयही त्यालाच एक कडी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. साथीच्या रोगापूर्वी, थायलंडच्या (Thailand) जीडीपी आणि रोजगारामध्ये पर्यटनाचा 20 टक्के वाटा होता.

आरोग्यमंत्र्यांना गांजापासून अर्थव्यवस्थेत सुधारणा अपेक्षित

गांजा उत्पादनांची व्यावसायिक विक्री आणि वैयक्तिक लागवड कायदेशीर करण्याचा निर्णय थायलंड सरकारने घेतला आहे. कारण ते नगदी पीक आहे. आरोग्य मंत्री अनुतिन चरणवीरकुल म्हणाले की, थायलंडचे सुमारे एक तृतीयांश कामगार अजूनही कृषी (Agriculture) क्षेत्रात कार्यरत आहेत, परंतु देशाला आता गांजा उद्योग देखील विकसित करायचा आहे. गांजा उद्योगाचे मूल्य 2 अब्ज डॉलर्सच्या पुढे घेऊन जाण्याची आम्हाला आपेक्षा आहे.

नव्या कायद्यात तरतूद

थाई लोक त्यांच्या घरात गांजाचे रोप देखील वाढवू शकतात. परंतु त्याचा वापर फक्त आणि फक्त वैद्यकीय हेतूसाठी करण्यात यावा. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे काही करताना आढळल्यास 60 हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिने कारावास होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT