Texas Dairy Farm: अमेरिकेमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पश्चिम टेक्सासमधील एका डेअरी फार्ममध्ये मोठा स्फोट आणि आग लागल्याने सुमारे 18,000 गायींचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी, टेक्सासमधील डिमिटमधील साउथ फोर्क डेअरी फार्ममध्ये स्फोट झाला. दरम्यान आग विझवण्याचे काम अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर केले. या आगीनंतर असे दिसून आले की, तब्बल 18,000 गायींचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, यूएसमध्ये दररोज कत्तल केल्या जाणाऱ्या गायींच्या जवळपास तिप्पट ही संख्या होती. यात कोणत्याही प्रकारची मानवी हानी झाली नाही, परंतु एका दुग्धशाळेतील कामगाराला वाचवून रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मंगळवारपर्यंत, त्याची प्रकृती गंभीर होती, परंतु आता स्थिर आहे.
दुसरीकडे, स्फोट कसा सुरु झाला हे अद्यापही अस्पष्टच आहे. यूएसए टुडेनुसार, टेक्सास अग्निशमन अधिकारी स्फोटाच्या कारणाचा शोध घेत आहेत.
त्याचबरोबर, आगीत मरण पावलेल्या बहुतेक गायी होल्स्टीन आणि जर्सी गायींचे मिश्रण होत्या, या फार्ममधील एकूण गायींच्या अंदाजे 90 टक्के प्रतिनिधित्व करतात. स्फोट झाला तेव्हा गायी एका होल्डिंग पेनमध्ये एकत्र अडकल्या होत्या.
यूएसए टुडेनुसार प्रत्येक गायीची किंमत "अंदाजे" $2,000 इतकी असल्याने पशुधनाच्या नुकसानाचा शेतीवर मोठा आर्थिक परिणाम होईल.
तसेच, स्थानिकांनी KFDA न्यूज चॅनल 10 ला सांगितले की, 'आम्ही एक मोठा आवाज ऐकला आणि अनेक मैलांपर्यंत धुराचे लोट दिसले. काळा धूर आजूबाजूच्या शहरांमधूनही दिसत होता.' साउथ फोर्क डेअरी फार्म कॅस्ट्रो काउंटीमध्ये स्थित आहे, जे टेक्सासमधील सर्वाधिक दुग्ध-उत्पादक काउंटींपैकी एक आहे. टेक्सासच्या 2021 च्या वार्षिक डेअरी पुनरावलोकनानुसार कॅस्ट्रो काउंटीमध्ये 30,000 पेक्षा जास्त गुरे आहेत.
शिवाय, 2013 मध्ये अॅनिमल वेल्फेअर इन्स्टिट्यूटने फार्ममधील आगीचा मागोवा घेण्यास सुरुवात केल्यापासून ही घटना गुरांच्या मृत्यूची सर्वात मोठी घटना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.