America Visa Hike: अमेरिकेत 'या' तारखेपासून शिक्षण घेणे, फिरायला जाणे महागणार

विविध व्हिसा शुल्कात केली वाढ
America Visa Hike
America Visa HikeDainik Gomantak

America Visa Hike: देशात काही करू पाहणारे लोक जसे मुंबई किंवा इतर मेट्रो सिटींकडे धाव घेत असतात, तसेच जगात अमेरिकेबाबत आहे. जगात काही करू पाहणारे लोक अमेरिकेकडे धाव घेत असतात. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण घेण्यास खूप महत्व आहे. तथापि, आता अमेरिकेत शिक्षण घेणे तसेच प्रवास करणे महागणार आहे.

America Visa Hike
Twitter Legacy Blue Tick Removal: 'या' तारखेनंतर ट्विटरवरील ब्लु टीक हटविण्यास करणार सुरवात; एलन मस्क यांची घोषणा

अमेरिकेत तुम्ही शिकण्यासाठी किंवा प्रवासासाठी जात असाल तर तुम्हाला 30 मे नंतर अधिक शुल्क भरावे लागेल, कारण अमेरिकेने त्यांच्या व्हिसा शुल्क वाढ केली आहे. यूएस पर्यटक, व्यवसाय (B1/B2) तसेच विद्यार्थी आणि इतर श्रेणींसाठी अमेरिकेने व्हिसा शुल्कात वाढ केली असून ही वाढ 30 मे 2023 पासून लागू केली जाणार आहे.

ठराविक नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज (NIV) प्रक्रिया शुल्क, व्यवसाय किंवा पर्यटन (B1/B2) साठी अभ्यागत व्हिसा यासाठीचे शुल्क 160 ते 185 डॉलरपर्यंत वाढेल. म्हणजेच भारतीय रूपयांत ही वाढ 13628.82 रूपये ते 15188.74 रूपये असेल.

तात्पुरत्या कर्मचाऱ्यांसाठी (H, L, O, P, Q, आणि R श्रेणी) ठराविक याचिका-आधारित नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी शुल्क 190 (15599.25 रूपये) ते 205 डॉलरपर्यंत (16830.77 रूपये) वाढेल.

America Visa Hike
Goa Job Fraud Case: गोव्याच्या तरूणीला परदेशात बनवले मोलकरीण; चांगल्या नोकरीच्या आमिषाने फसवणूक

करार अर्जदार, करार व्यापारी आणि विशेष व्यवसायांसाठी शुल्क 205 (16830.77 रूपये) वरून 315 डॉलरपर्यंत (25861.91 रूपये) वाढेल. या नियमामुळे इतर कॉन्सुलर फी वर परिणाम होणार नाही. ज्यामध्ये दोन वर्षांच्या निवासासाठी आवश्यक असलेल्या शुल्काच्या माफीचा समावेश आहे.

मागील वर्षी 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर घेतलेल्या व्हिसा मुलाखतींसाठी सर्व शुल्क देयके शुल्क भरणा चलन जारी केल्यापासून 365 दिवसांसाठी वैध आहेत. अर्जदारांनी 1 ऑक्टोबर 2022 पूर्वी भरलेले शुल्क या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत वैध असेल. या कारणास्तव, अर्जाची फी 30 सप्टेंबरपूर्वी जमा करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com