America: अमेरिकेत शिक्षकावर गोळीबार, 6 वर्षाच्या मुलाला घेतले ताब्यात

संबंधित शिक्षिकेला झालेली दुखापत ही गंभीर आहे. मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्यात सुधारणा झाल्याचे दिसून आलंय.
Injury
InjuryDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूपोर्ट न्यूज, व्हर्जिनिया येथील रिचनेक एलिमेंटरी स्कूलमध्ये शुक्रवारी एका 6 वर्षीय मुलाने एका शिक्षकावर गोळी झाडून जखमी केल्याची घटना घडली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने या वृत्ताला दुजोरा दिलाय या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. या घटनेनंतर त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संबंधित शिक्षिकेला झालेली दुखापत ही गंभीर आहे. मात्र तिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्यात सुधारणा दिसून आल्याचे पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्र्यू यांनी सांगितले.

6 वर्षाच्या मुलाने हँडगन कशी मिळवली आणि नेमकी घटना काय घडली या बाबत कोणतेही स्पष्टीकरण नाही. स्टीव्ह ड्र्यू पुढे म्हणाले की संबंधित मुलाला सध्या ताब्यात घेतला असून त्याने बंदुक कुठून आणली याचा शोध सध्या सुरू आहे. इतर विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना व्यायामशाळेत हलवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच शाळेच्या एस्कॉर्ट अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशी भेटवण्यात आले आहे.

Injury
Pakistan Army Chief: पैसा, सुरक्षा...! कंगाल पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची सौदी वारी

न्यूपोर्ट न्यूजचे महापौर फिलिप जोन्स यांनी पत्रकारांना सांगितले की, असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून योग्य पावले उचलत आहोत. तर शाळेचे अधीक्षक जॉर्ज पार्कर म्हणाले, "आम्हाला आमच्या तरुणांच्या हातातून बंदुका दूर ठेवण्याची गरज आहे. या घटनेनंतर सर्व शाळा कॅम्पस मेटल डिटेक्टरने सुसज्ज करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com