Tesla planning to set up a powerwall battery storage system factory in India. However, the Indian authorities have rejected this proposal. Dainik Gomantak
ग्लोबल

Tesla In India: मोदी सरकार-टेस्लाच्या चर्चेच्या फेऱ्यांत अडकली मस्कची महत्त्वाकांक्षी 'पॉवरवॉल'

Ashutosh Masgaunde

Tesla planning to set up a powerwall battery storage system factory in India. However, the Indian authorities have rejected this proposal: टेस्ला आता भारतात बॅटरी स्टोरेज सिस्टम फॅक्टरी उभारण्याचा विचार करत आहे. इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीने भारतात बॅटरी स्टोरेज फॅक्टरीसाठी योजना तयार केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या फॅक्टरीसाठी सरकारचे सहकार्य मिळावे यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

भारतात नवीन इलेक्ट्रिक वाहन कारखाना सुरू करण्याच्या चर्चेदरम्यान हा प्रस्ताव पुढे आला आहे.

टेस्लाकडून सवलतींच्या मागण्या

रॉयटर्सच्या अहवालानुसार कंपनीने नवी दिल्ली येथे अनेक बैठका घेतल्या आहेत. तसेच देशातील बॅटरी स्टोरेज क्षमतांना तिच्या "पॉवरवॉल"द्वारे सहकार्य करत व्यवसाय करण्याच प्रस्ताव ठेवला आहे.

रॉयटर्सने अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन पुढे सांगितले की, भारतीय अधिकार्‍यांनी मात्र टेस्लाच्या या प्रस्तावाल नकार दिला आहे.

टेस्लाने बॅटरी स्टोरेज फॅक्टरी उभारण्यासाठी अनेक सवलती मागितल्या असल्या तरी, भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की त्या मिळण्याची शक्यता नाही.

परंतु सरकार अशी उत्पादने खरेदी करणाऱ्यांना सबसिडी देऊन कंपनीसाठी योग्य व्यवसाय मॉडेल तयार करण्यात मदत करू शकते.

"टेस्लाला पॉवरवॉलची किंमत कमी करावी लागेल"

टेस्ला आणि भारत सरकार दोघेही या प्रस्तावावर काम करण्यास उत्सुक आहेत. आणि सरकार त्यावर खल करत आहे, परंतु ही योजना प्रत्यक्षात येईल की नाही हे निश्चित नाही, असे एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले.

पॉवरवॉलचा प्रस्ताव हा टेस्ला कंपनीच्या भारतातील व्यवसाय वाढवण्याच्या एक भाग आहे. EVs च्या पलीकडे विचार करून, टेस्ला त्यांच्या बॅटरी स्टोरेज सिस्टमसाठी निवासी तसेच औद्योगिक ग्राहक शोधण्यास उत्सुक आहे, असे दुसर्‍या एका स्त्रोताने रॉयटर्सला सांगितले.

भारतीय अधिकार्‍यांनी असेही सांगितले आहे की, टेस्लाला त्यांच्या बॅटरी स्टोरेज उत्पादनांची किंमत कमी करण्यासाठी काम करावे लागेल. जिथे मागणी जास्त असण्याची अपेक्षा तिथे बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यास सरकार मदत करू शकते.

भारतातील वीज संकट

भारत गेल्या काही वर्षांपासून शहरे आणि खेड्यांमध्ये वीज पुरवठ्याला चालना देत आहे. परंतु तरीही मागणी वाढल्याने पीक-टाइममध्ये देशाला वीज टंचाईचा सामना करावा लागतो.

भारताला ही टंचाईची समस्या मुख्यत्वे कोळशावर आधारित वीजनिर्मितीमुळे होत आहे. दुसरीकडे कारण स्टोरेज तंत्रज्ञान महाग आहे आणि अद्याप व्यापक नसल्याने याचा भारतात जास्त वापर होत नाही.

गेल्या वर्षी, कोळसा वाहतूक समस्यांमुळे भारताला गेल्या दशकभरातील सर्वात वाईट वीज संकटाचा सामना करावा लागला. तसेच कोळसा आणि जलविद्युत क्षमता जोडण्यास विलंब झाल्यामुळे आणि सौरऊर्जा उपलब्ध नसल्याने, देशात रात्रीच्या वीज कपातीचा धोका वाढला आहे.

काय आहे पॉवरवॉल?

टेस्लाची पॉवरवॉल हे गॅरेजमध्ये किंवा घराच्या बाहेर टांगण्यायोग्य डिझाइन केलेले एक आकर्षक युनिट आहे.

2015 मध्ये टेस्लाच्या कॅलिफोर्निया कॅम्पसला मस्क सोबत दिलेल्या भेटीदरम्यान, मोदींनी उत्पादनाचे कौतुक केले होते.

नंतर सांगितले होते की, पॉवरवॉल बॅटरी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कशी मदत करू शकते यावर चर्चा करताना मला आनंद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT