शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तीन महिन्यांत घराघरात पोहचणार किसान क्रेडिट कार्ड

जर शेतकऱ्यांनी किसान क्रिडिट कार्ड घेतले नाही तर ते का घेतेले नाही ? याचे सरकारला उत्तर देण्यास बॅंका जबाबदार असतील.
Kisan Credit Card
Kisan Credit CardDainik Gomantak

Under the Pradhan Mantri Shetkari Samman Nidhi Yojana, all farmer beneficiaries will get a Kisan Credit Card in the next three months:

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व शेतकरी लाभार्थ्यांना येत्या तीन महिन्यात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. अशी घोषणा कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतीच केली.  

या योजनेची सुरवात येत्या १ आक्टोंबर रोजी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची तपशील ऋण पोर्टलवर उपलब्ध असणार आहे.

किसान क्रिडिट कार्ड मोहिम घरोघरी राबवली जाणार आहे. तसेच मोहिम पूर्णपणे डिजिटल स्वरुपात असणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

केसीसीच्या कामाची जबाबदारी कोणाकडे?

किसान क्रिडीट कार्डचे काम जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, आणि ग्रामीण बॅंकाद्वारे राबवण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सेवा मिळणार आहे. तसेच ’ऋण पोर्टलवर’ शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची माहिती तसेच रक्कम जमा करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आर्थिक सेवा विभागाचे सचिव आणि गाम्रीण बॅंकेतील डिजिटल सुविधा सुसज्ज करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

बॅंकांवर शेतकऱ्यांची जबाबदारी

आता बॅंकेला शेतकऱ्यांच्या शंकाचे पूर्णपणे निरासन करावे लागणार आहे. तसेच जर शेतकऱ्यांनी किसान क्रिडिट कार्ड घेतले नाही तर ते का घेतेले नाही ? याचे सरकारला उत्तर देण्यास बॅंका जबाबदार असतील.

पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 7 %  व्याजदरावर ३ लाख रुपये कर्ज देण्यात येते. तसेच शेतकऱ्याने कर्जाची रक्कम वेळेवर भरली तर त्यामध्ये ३% ट्क्के सवलत दिली जाते.

बॅंकांकडे किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची माहिती असल्याने, ज्या शेतकऱ्यांकडे किसान कार्ड नाही त्यांना संपर्क करुन कार्ड देण्यात येणार आहेत. 

Kisan Credit Card
गोष्ट जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची, स्वताच्यात कंपनीतून 88 लाख रुपये पगार घेणाऱ्या तरुणीची

मार्चपर्यंत किती KCC खाती होती?

देशात 30 मार्चपर्यंत, सुमारे 7.35 कोटी KCC खाती होती, ज्यांची एकूण मंजूर कर्ज मर्यादा 8.85 लाख कोटी रुपये आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत सवलतीच्या व्याजदरावर 6,573.50 कोटी रुपयांचे कृषी-कर्ज वितरित केले आहे. इतर शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिटचा लाभ मिळावा यासाठी, PM किसान योजनेअंतर्गत निवडलेल्या गैर-KCC धारक शेतकरी निश्चित केले आहेत.

Kisan Credit Card
Banking Tips: खात्यातून पैसे कट झाले, तर मग 24 तासात करा हे काम...

योजनेची पात्रता

या योजनेचा लाभ खालील पात्रता पूर्ण करणाऱ्यांना मिळणार आहे;

  • वैयक्तिक शेतकरी जो शेतीचा मालक आहे.

  • शेतकरी वाटेकरी आणि भाडेकरू

  • भागपीक शेतकरी, भाडेकरू शेतकरी इत्यादींचे स्वयं-सहायता गट.

  • पीक उत्पादन किंवा पशुपालन यांसारख्या कामांमध्ये गुंतलेले शेतकरी.

  • मत्स्य उत्पादक, मच्छीमार, स्वयंसहाय्यता गट

  • मच्छीमार ज्यांच्याकडे नोंदणीकृत बोट किंवा इतर कोणत्याही प्रकारची मासेमारी नौका आहे आणि ज्यांच्याकडे मुहाने किंवा समुद्रात मासेमारीसाठी आवश्यक परवाना किंवा परवानगी आहे.

  • कुक्कुटपालन, शेळ्या-मेंढ्या पाळणारे शेतकरी.

  • दुग्धउत्पादक शेतकरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com