Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

टेस्ला भारतात लॉन्च का होत नाही?: एलन मस्क म्हणाले...

इलेक्ट्रिक कार कंपनी असलेली टेस्ला (Tesla) अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमन्तक

इलेक्ट्रिक कार कंपनी असलेली टेस्ला अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कंपनीने आपल्या प्रयत्नात फारशी प्रगती केलेली नाही. आता एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट करुन आपली कार भारतात (India) लॉन्च करु न शकण्याचे कारण दिले आहे.

जेव्हा ट्विटरवरील एका वापरकर्त्याने त्यांना टेस्ला कारच्या भारतातील संभाव्य लॉन्च तारखेबद्दल विचारले तेव्हा मस्कने उत्तर दिले, "कंपनी सध्या (India Government) सोबत अनेक मुद्यांवर काम करत आहे." तथापि, हे कोणते मुद्दे आहेत आणि ते सरकारसोबत समस्यांचे निराकरण करण्याचा कसा प्रयत्न करत आहेत हे मस्क यांनी स्पष्ट केलेले नाही.

मस्कने सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते – टेस्ला भारतात लॉन्च करू इच्छिते मात्र...

एलन मस्क यांनी जुलै 2020 मध्ये केलेल्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, आम्हाला भारतात टेस्ला (Tesla) लॉन्च करायची आहे, परंतु जगातील सर्व प्रमुख देशांच्या तुलनेत भारतावर सर्वाधिक आयात शुल्क आहे. टेस्लाला भारतातील टॅरिफमधून तात्पुरती सवलत अपेक्षित आहे.

भारतात इलेक्ट्रिक कारचे शुल्क किती

भारतात, $40,000 (More than 28 lakhs) किमतीच्या आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर 100 टक्के कर आकारला जातो, तर त्यापेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर 60 टक्के कर आकारला जातो. मस्क या अर्थाने, मस्कच्या कंपनीने भारतात कार लॉन्च केल्या तरी त्यांच्या किंमती खूप जास्त असतील आणि त्यांची विक्रीही भारतात खूपच कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT