Nigeria: तब्बल सात महिन्यांनंतर 'Twitter' वरील हटवले बॅन

नायजेरिया (Nigeria) या पश्चिम आफ्रिकन देशात सात महिन्यांनंतर सरकारने ट्विटरवरील (Twitter ban in Nigeria) बंदी उठवली आहे.
Twitter
TwitterDainik Gomantak

नायजेरिया (Nigeria) या पश्चिम आफ्रिकन देशात सात महिन्यांनंतर सरकारने ट्विटरवरील (Twitter ban in Nigeria) बंदी उठवली आहे. या बंदीमुळे देशातील 200 दशलक्षाहून अधिक लोकांचा सोशल मीडिया नेटवर्कपासून संपर्क तुटला होता. देशाच्या नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक काशिफू इनुवा अब्दुल्लाही (Kashifu Inuwa Abdullah) यांच्या मतानुसार, नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मद बुहारी यांनी निर्देश दिले की, ट्विटर गुरुवारी देशात पुन्हा काम सुरु करेल. ट्विटरने नायजेरियामध्ये कार्यालय उघडण्यासह काही अटी पूर्ण करण्यास सहमती दर्शविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, नायजेरियाने (Nigeria) गेल्या वर्षी 4 जून रोजी सोशल नेटवर्किंग साइटचे ऑपरेशन थांबविण्यात आले होते. त्यानंतर नायजेरियन सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. सोशल मीडिया नेटवर्कने बुहारी यांची पोस्ट काढून टाकल्यानंतर लगेचच ही कारवाई नायजेरियाकडून करण्यात आली होती. आफ्रिकेतील (West Africa) सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या एका देशात ट्विटर बंद होणे हे आश्चर्यकारक होते.

Twitter
एरिक एम गार्सेटी यांना भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नामांकन

अध्यक्ष मुहम्मद बुहारी काय म्हणाले?

खरं तर, ट्विटरने (Twitter) काढलेल्या पोस्टमध्ये (Twitter ban lift in Nigeria), अध्यक्ष मुहम्मद बुहारी यांनी फुटीरतावाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची धमतकी दिली होती. त्याचवेळी अब्दुल्लाही एका निवेदनात म्हणाले की, 'कंपनीच्या कायदेशीर हितसंबंधांना धक्का न लावता देशासाठी जास्तीत जास्त परस्पर सहकार्यासाठी ट्विटरसोबतचे पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमची कंपनीशी अतिशय सौहार्दपूर्ण आणि यशस्वी चर्चा झाली.

शिवाय, अब्दुल्लाही पुढे म्हणाले, 2022 च्या पहिल्या तिमाहीत नायजेरियामध्ये नोंदणी करण्याव्यतिरिक्त, Twitter ने (Nigeria Twitter News) देशासाठी अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करणे, कर दायित्वांचे पालन करणे आणि नायजेरियाचे नागरिक जबाबदार आहेत याची खात्री करणे यासह इतर अटींना सहमती दर्शवली आहे. यामध्ये आदरपूर्वक काम करणेही समाविष्ट आहे. कायद्यात राष्ट्रीय संस्कृती आणि इतिहासाची स्वीकृतीचा देखील समावेश आहे. तथापि, ट्विटरच्या प्रवक्त्याने टिप्पणीच्या विनंतीला अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com