Terrorist Secret Communication Dainik Gomantak
ग्लोबल

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Pornographic Websites Terrorism: दहशतवादी संघटनांकडून ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचे उघड झाल्यानंतर आता सुरक्षा संस्थांनी दहशतवाद्यांची व त्यांच्या हस्तकांची आणखी एक कार्यपद्धती उघड केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

श्रीनगर, नवी दिल्ली: दहशतवादी संघटनांकडून ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचे उघड झाल्यानंतर आता सुरक्षा संस्थांनी दहशतवाद्यांची व त्यांच्या हस्तकांची आणखी एक कार्यपद्धती उघड केली आहे. गुप्त संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी दहशतवादी आता अश्लील संकेतस्थळे (पोर्नोग्राफी) व एनक्रिप्टेड ॲप्लिकेशन्सचा वापर करत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दहशतवादी संघटनांबरोबरच पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संंस्थेकडूनही जम्मू व काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या भरतीसंदर्भात संदेश पाठविण्यासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावरील पाळत चुकविण्यासाठीही या संकेतस्थळांची मदत घेतली जात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अश्लील संकेतस्थळांवर रीअल-टाइम चॅटची सुविधा असते. जवळच्या परिसरातील व्यक्तींशी डेटिंगसाठी संपर्क साधण्याच्या नावाखाली ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

दहशतवाद्यांचे हस्तक संदेश प्रसारित करण्यासाठी तसेच विविध कारवायांमध्ये समन्वय साधण्यासाठी या चॅट सुविधेचा गैरवापर होत आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये युवकांची भरती करण्यासाठीही दहशतवादी संघटनांकडून अश्लील संकेतस्थळांच्या मेसेजिंग ॲप्सचा वापर केला जात आहे.

टॉर नेटवर्कचा गैरवापर

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, टॉर नेटवर्कचा वापर करणाऱ्या अनेक प्लॅटफॉर्मचा मागोवा घेणे सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरते. या नेटवर्कमध्ये एन्क्रिप्टेड डेटा जगभरात अनेक रिले नोड्समधून वळवला जातो.

त्यामुळे डेटाचा मूळ स्रोत आणि अंतिम ठिकाण दोन्ही लपवले जात असल्याने संबंधित वापरकर्ते किंवा संवादाचा माग काढणे अधिक कठीण होते. अमेरिकेतील संस्था द टॉर प्रोजेक्टकडून टॉर नेटवर्कची देखभाल केली जाते. गोपनीयता जपण्यासह इंटरनेटवरील सेन्सॉरशिपला विरोधासाठी टॉरचा कायदेशीर वापर होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT