Pakistan Terrorist Attack Twitter
ग्लोबल

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर दहशतवादी हल्ला, 3 अतिरेकी ठार, 3 विमाने जाळून खाक

तहरीक-ए-जिहाद नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

Pramod Yadav

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला आहे. पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर आत्मघातकी हल्लेखोरांसह सहा शस्त्रधारी दहशतवादी घुसले आहेत.

दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होत असून त्याचा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये एअरबेसच्या आत आगीचे प्रचंड लोट दिसत आहेत. आतापर्यंत एक हल्लेखोर ठार झाला आहे. तहरीक-ए-जिहाद नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पाकिस्तानी लष्कराने (ISPR) या हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. "4 नोव्हेंबर 2023 च्या पहाटे पाकिस्तानी हवाई दलाच्या मियांवली ट्रेनिंग एअर बेसवर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला. जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर देऊन, कर्मचारी आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करत हा हल्ला हाणून पाडला. सुरक्षा दलाच्या जवानांनी कमालीचे धैर्य दाखवत 3 दहशतवाद्यांना तळात प्रवेश करण्यापूर्वीच ठार केले, तर उर्वरित 3 दहशतवाद्यांना जवानांनी घेरले," असे त्यात म्हटले आहे.

लष्कराच्या निवेदनानुसार, 'हल्ल्यादरम्यान तळावर उभी असलेली तीन लढाऊ विमाने आणि इंधन बाउझरचे आगीत नुकसान झाले. परिसर मोकळा करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) चे प्रवक्ते मुल्ला मुहम्मद कासिम यांनी मियांवली एअरबेसवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यात अनेक आत्मघाती हल्लेखोरही सामील असल्याचा दावा केला आहे.

स्थानिक रहिवाशांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून हल्ल्याची पुष्टी केली आहे. या दहशतवादी गटाने तळावर असलेला एक टाकी उद्ध्वस्त केल्याचा दावाही केला आहे.

दहशतवाद्यांनी मियांवली येथील पाकिस्तानी एअरबेसच्या भिंती ओलांडण्यासाठी शिडीचा वापर केला आणि नंतर आत घुसून हल्ला सुरू केला आणि बॉम्बस्फोट केला. आत्मघातकी हल्लेखोरांविरुद्ध पाकिस्तानी लष्कराची कारवाई सुरू असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

Cyber Fraud Safety Tip: दिवाळीत शॉपिंग करताना सावधान! 80 टक्के डिस्काउंटच्या नावाखाली सायबर भामटे घालू शकतात गंडा, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT