Bangladesh New PM Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Bangladesh New Cabinet: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) नेते तारिक रहमान यांनी मंगळवारी (17 फेब्रुवारी) देशाच्या पंतप्रधानपदाची अधिकृत शपथ घेतली.

Manish Jadhav

Bangladesh New Prime Minister Tarique Rahman: बांगलादेशच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली असून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) नेते तारिक रहमान यांनी मंगळवारी (17 फेब्रुवारी) देशाच्या पंतप्रधानपदाची अधिकृत शपथ घेतली. सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाला ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतर 60 वर्षीय तारिक रहमान यांच्याकडे आता देशाची धुरा सोपवण्यात आली.

या शपथविधी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी दीर्घकाळापासून चालत आलेली 'बंगभवन'मधील शपथविधीची परंपरा मोडीत काढली. त्याऐवजी संसदेच्या 'साउथ प्लाझा'मध्ये हा भव्य सोहळा पार पडला. तत्पूर्वी, बीएनपीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी संसदीय दलाचे नेते म्हणून तारिक रहमान यांची एकमताने निवड केली होती.

तारिक रहमान यांच्या या नव्या मंत्रिमंडळात सर्वसमावेशकतेची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मंत्रिमंडळात दोन हिंदू नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे, ज्यामुळे जगभरात या मंत्रिमंडळाची चर्चा होत आहे. निताई रॉय चौधरी आणि दीपेन दीवान चकमा या दोन हिंदू नेत्यांनी तारिक रहमान यांच्यासोबत मंत्री म्हणून शपथ घेतली.

बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तारिक रहमान यांच्यासोबतच इतर अनेक मंत्र्यांनीही यावेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

कट्टर प्रतिस्पर्धी शेख हसीना यांच्या सत्ताकाळानंतर बांगलादेशमध्ये झालेला हा सत्तापालट अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तारिक रहमान यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर देशात लोकशाही अधिक बळकट करण्याचे आणि आर्थिक सुधारणांना गती देण्याचे आश्वासन दिले आहे. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दाखवलेली ही सर्वसमावेशकता बांगलादेशच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरु शकते. दक्षिण आशियाई राजकारणाच्या दृष्टीने तारिक रहमान यांचे सरकार आता भारतासोबतचे संबंध कसे हाताळते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT