Afghan Women Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानचा नवा फर्मान, टीव्ही अँकरला हिजाब घालणे केले बंधनकारक !

अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवलेल्या तालिबानने नवा फर्मान जारी करत महिलांवरील बंदी वाढवली आहे. त्यांनी रविवारी 'धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे' जारी केली आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानने नवा फर्मान जारी करत महिलांवरील बंदी वाढवली आहे. त्यांनी रविवारी 'धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे' जारी केली आहेत. ज्यामध्ये देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांना त्या टीव्ही मालिका (Afghan TV Serials) बंद करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये महिला अभिनेत्री काम करतात. तालिबानच्या नैतिकता आणि गैरवर्तन निर्मूलन मंत्रालयाने अफगाण मीडियाला असा पहिला आदेश जारी केला आहे.

यासोबतच तालिबानने दूरचित्रवाणीवरील महिला पत्रकारांना बातम्या सादर करताना हिजाब घालायलाच हवा, असे सांगितले आहे. मंत्रालयाने वाहिन्यांना प्रेषित मुहम्मद किंवा इतर मान्यवरांबद्दल काहीही दाखवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम प्रसारित करु नये (Taliabn Rules For Afghan Media). इस्लामिक आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेल्या चित्रपटांवर किंवा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आदेशाने धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली नाहीत

मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'हे नियम नसून धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत.' रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली आहेत (Taliban New Religious Guidelines). तालिबानने दोहा करारात आश्वासन दिले होते की, आम्ही पूर्वीसारखे राज्य करणार नाही. परंतु तरीही तो नियम लागू केला आहे.

पत्रकारांवर अत्याचार

यासोबतच तालिबानने मीडिया स्वातंत्र्याचे आश्वासन दिले होते, मात्र अफगाणिस्तानमध्ये अनेक पत्रकारांवर हल्ले होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. 15 ऑगस्ट रोजी देशावर ताबा मिळवणारे तालिबान 20 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आले आहे. अशरफ घनी यांच्या काळात अफगाण मीडियाने बरीच प्रगती केली. (Taliban Rule in Afghanistan) 2001 मध्ये तालिबानची सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर खाजगी क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली आहे. टीव्ही आणि रेडिओ वाहिन्या सुरु झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT