Taliban leader Maulvi Hamdullah Mukhlis killed in Kabul blast  Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानच्या टॉप कमांडरचा बॉम्ब स्फोटात मृत्यू

मौलवी हमदुल्ला मुखलिस हा तालिबानचा टॉप कमांडर होता. काबूलच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो काबूल मिलिटरी कॉर्प्सचे प्रमुखही होता .

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातील (Afghanistan) काबूल (Kabul) येथील लष्करी रुग्णालयावर मंगळवारी झालेल्या हल्ल्यात तालिबानचा (Taliban) प्रमुख सहयोगी आणि हक्कानी नेटवर्कचा (Hakkani Network) नेता मौलवी हमदुल्ला मुखलिस (Maulvi Hamdullah Mukhlis) याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.एका एजन्सीच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. मुखलिस हा काबूल मिलिटरी कॉर्प्सचा मुख्य नेता होता. अश्रफ घनी (Ashraf Ghani) पळून गेल्यानंतर ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात घुसलेल्या तालिबान कमांडरपैकी तो एक होता. वृत्तानुसार, मंगळवारी लष्करी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.(Taliban leader Maulvi Hamdullah Mukhlis killed in Kabul blast)

तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून अफगाहणीस्तानात सतत हल्ले होत आहेत . हा हल्ला एका आत्मघातकी हल्लेखोराने केला होता ज्याने रुग्णालयाच्या गेटबाहेर स्वत:ला उडवले होते. यानंतर बंदूकधारी रुग्णालयाच्या आवारात घुसले आणि त्यांनी तुफान गोळीबार सुरू केला.इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, काबूलच्या 15 व्या जिल्ह्यातील रुग्णालयावरील हल्ला हाणून पाडण्यात आला आणि चारही हल्लेखोर ठार झाले आहते . तालिबानने एका निवेदनात म्हटले आहे की, हल्लेखोरांचा उद्देश निरपराध नागरिक, डॉक्टर, रूग्णालयातील रूग्णांना मारण्याचा होता, परंतु इस्लामिक अमिरातीच्या सतर्क सैन्याने त्यांना ठार केले आहे.

विशेष म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. जगातील अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी अलिकडच्या आठवड्यात देशात अनेक हल्ले केले आहेत. देशाच्या सत्ताधारी तालिबानचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी असोसिएटेड प्रेस (एपी) ला सांगितले की, काबुलमधील सरदार मोहम्मद दाऊद खान मिलिटरी हॉस्पिटलच्या बाहेर नागरिकांना लक्ष्य करणारा स्फोट घडवून आणण्यात आला आहे.

मौलवी हमदुल्ला मुखलिस कोण होता?

मौलवी हमदुल्ला मुखलिस हा तालिबानचा टॉप कमांडर होता. काबूलच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो काबूल मिलिटरी कॉर्प्सचे प्रमुखही होता . मुखलिसांनीच तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यातील समन्वयासाठी काम केले होते . तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी हक्कानी नेटवर्कचा नंबर दोनचा सदस्य अनस हक्कानी याच्याकडे सोपवण्यात आली होती. नंतर राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी मौलवी हमदुल्ला मुखलिस यांच्याकडे सोपवण्यात आली होती . 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर मौलवी हमदुल्ला मुखलिस हा राष्ट्रपती भवनात प्रवेश करणारा पहिला व्यक्ती होता. आणि त्याचा त्याचा फोटो जगभर व्हायरल झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP Poster War: रुमडामळमध्‍ये 'पोस्टर वॉर', भाजपचे दोन गट भिडले! पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

Court Verdict: 4.52 कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणी माविन गुदिन्हो दोषमुक्‍त, पर्रीकरांनी केले होते आरोप; तब्‍बल 27 वर्षानंतर निकाल

Rashi Bhavishya 26 August 2025: मनातील गोंधळ कमी होईल, महत्त्वाच्या कामांना गती मिळेल; वाचा तुमच्या राशीचं भविष्य

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

SCROLL FOR NEXT