अफगाणिस्तान पुन्हा हादरले, काबूलमध्ये मोठा स्फोट

शहरातील सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर हा स्फोट झाला असून हा अतिरेक्यांनी केलेला आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे
Afghanistan: powerful explosion in Kabul
Afghanistan: powerful explosion in KabulDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुल (Kabul) पुन्हा मोठ्या स्फोटाने हादरले आहे. शहरातील सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर हा स्फोट झाला असून हा अतिरेक्यांनी केलेला आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे (Terrorist Attack). घटनास्थळावरून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्रथम एक जबरदस्त स्फोट झाला, त्यानंतर गोळीबाराचा आवाज आला. या स्फोटामुळे कोणी जखमी झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय स्फोटाचे कारणही समजू शकलेले नाही.(Afghanistan: powerful explosion in Kabul)

मात्र त्याचवेळी तालिबानकडून राजधानीत झालेल्या स्फोटाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून काबूलमध्ये सातत्याने स्फोट होत आहेत. यातील बहुतांश बॉम्बस्फोट इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या संघटना करत आहेत अशी माहिती देखील अनेकवेळा समोर आली आहे.तालिबानने मात्र लवकरच इस्लामिक स्टेटवर मात करून देशात शांतता प्रस्थापित करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, युद्धग्रस्त देशाच्या उत्तर भागात इस्लामिक स्टेट अधिक बळकट झालेले पाहायला मिळत आहे आतापर्यंत या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानच्या विविध भागात स्फोट घडवून आणले आहेत.

दरम्यान अफघाणची राजधानी काबूलमध्ये यापूर्वी देखील स्फोट झाला होता आणि तो सर्वात धोकादायक स्फोट ऑगस्टमध्ये विमानतळावर दिसला होता. अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा असल्यापासून देश सोडू पाहणारे लोक मोठ्या संख्येने काबूल विमानतळावर जमले होते. 26 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले होते.या हल्ल्यांबाबत माहिती देताना काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघाती हल्ले करण्यात आले असून 31 ऑगस्टची अंतिम मुदत जवळ आल्याने विमानतळावर संभाव्य हल्ल्याची भीती पाश्चात्य राष्ट्रांना आधीच होती अशी माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली होती.

Afghanistan: powerful explosion in Kabul
पाकिस्तानात अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ, जगभरातून इम्रान सरकारवर टीका

इस्लामिक स्टेटने हा स्फोट घडवून आणला होता ही माहिती स्वतः त्या संघटनेने दिली होती स्फोटापूर्वी अनेक देशांनी आपल्या लोकांना विमानतळापासून दूर राहण्यास सांगितले होते आणि त्यापैकी एकाने आत्मघाती बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याचे देखील सांगितले होते. अफगाणिस्तानातील काबुल विमानतळावर जमलेल्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या इस्लामिक स्टेट (IS किंवा ISIS) च्या दहशतवाद्यांनी केलेल्या संशयास्पद हल्ल्याचे अत्यंत विश्वासार्ह गुप्तचर अहवाल आहेत, असा इशारा ब्रिटिश सरकारने दिला आहे.हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबानला सांगितले की ते इस्लामिक स्टेटशी लढण्यासाठी एकत्र येऊ शकतात, परंतु तालिबानने मदत नाकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com