अमेरिकी आणि नाटो सैन्यांनी अफगाणिस्तानमधून (Afghanistan) बाहेर पडल्यानंतर अस्थिरता माजायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी तालिबानचे समर्थन केले आहे. खान यांनी तालिबानी आतकंवादी (Taliban) हे सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान खान म्हणाले की, अफगाणिस्तान जाऊन अमेरिकेने तिथली परिस्थिती अधिक बिघडवली.
तालिबानच्या मदतीसाठी सुमारे 10,000 पाकिस्तानी रेंजर्स यांनी आपली सीमा ओलांडली असल्याचे एका अहवालामधून दावा करण्यात आला आहे. या सगळ्या पाश्वभूमीवर इम्रान खान यांनी संताप व्यक्त करत म्हणाले, हे अगदी चुकीचे आहे, ते याचा पुरावा आम्हाला का देत नाही ? अफगाणिस्तानच्या समस्येवर युध्द हा पर्याय नाही तर त्यासाठी राजकिय तोडग्यामधूनच मार्ग निघू शकतो असही ते यावेळी म्हणाले आहेत.
तालिबानचा प्रभाव अफगाणिस्तान प्रभाव अधिकाअधिक वाढत आहे. दिवसेंदिवस अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्याच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीसाठी अमेरिकेला दोषी ठरवले आहे. तालिबान्यांना अमेरिकेने योग्यरित्या हाताळले नाही. तालिबानी हे सामान्य नागरिकाप्रमाणे आहेत. ते कोणत्याही लष्कराच्या पोशाखामध्ये नसतात. अमेरिकेला हे मात्र तिथे असून समजले नाही. अमेरिकेने हस्तक्षेप केल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडली आहे, असे खान यांनी म्हटले आहे.
अमेरिकन वृत्तवाहिनी पीबीएसचे पत्रकार ज्युडी वुड्रफ यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंबंधीचे वक्तव्य केले आहे. इम्रान खान म्हणाले, ''अफगाणिस्तानमधील समस्या युध्दा करुन सुटु शकत नाही तर त्यासाठी राजकिय तोडगा काढणे आपेक्षित आहे. दुसरीकडे मला तालिबानी खान आणि अमेरिकी विरोधी म्हणून प्रोजेक्ट केले.''
अमेरिकेकडून चुका झाल्या
खान पुढे म्हणाले, अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर लष्करी तोडगा निघू शकत नाही हे जेव्हा महासत्ता असलेल्या अमेरिकेला समजले तेव्हा खूप उशीर झाला होता. एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे दहा हजाराहून अधिक सैन्य होते. योग्यवेळीच अमेरिकेने तालिबान्यांशी करार करायला पाहिजे होता. अफगाणिस्तानच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ राजकिय तोडग्यामधून मार्ग संभव आहे. हा केवळ एकमेव मार्ग आहे हे सत्य आहे की आता अफगाणिस्तान सरकारमध्ये तालिबान्यांचा सहभाग वाढत चालला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.