अफगाणिस्तान होणार दुसरे 'सौदी अरेबिया'; देशात खनिजांचा प्रचंड साठा

'अफगाणिस्तान' (Afghanistan) असा उच्चार केला असता आपल्या समोर सहसा तालिबान (Taliban) युद्ध, बॉम्ब आणि दारिद्र्यातून उद्ध्वस्त झालेल्या शहरांचा देश एवढच काहीसं लक्षात येतं.
 Afghanistan Desert
Afghanistan DesertDainik Gomantak
Published on
Updated on

'अफगाणिस्तान' (Afghanistan) असा उच्चार केला असता आपल्या समोर सहसा तालिबान (Taliban) युद्ध, बॉम्ब आणि दारिद्र्यातून उद्ध्वस्त झालेल्या शहरांचा देश एवढच काहीसं लक्षात येतं. तथापि, भारताशेजारी (India) असणाऱ्या या देशाकडे असा काही छुपा खजिना आहे, ज्यासाठी येत्या काळात जगभरातील देश अफगाणिस्तानकडे ओढले जात आहेत. खरं तर, भारतीय उपखंडाची आशियाशी प्लेटोशी झालेल्या टक्करी दरम्यान पृथ्वीवर उपस्थित असलेल्या दुर्मिळ खनिजांचा विशाल साठा अफगाणिस्तानात पोहोचला. या खनिजांचा शोध लागल्यास आताच्या अफगाणिस्तानचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून जाईल. पण जर हा 'खजिना' चुकीच्या देशाच्या हातात पडला तर मात्र परिस्थिती बदलू शकते. अशा परिस्थितीत जाणून घेऊया अफगाणिस्तानात काय आहे?.

2001 मध्ये अफगाणिस्तानात अमेरिकेने (America) प्रवेश केला आणि 2004 पर्यंत तालिबानांना हद्दपार केले. यानंतर अमेरिकन जिओलॉजिकल सोसायटीने (American Geological Society) अफगाणिस्तानात उपस्थित खनिजांची तपासणी करण्यास सुरवात केली. 2006 मध्ये, अमेरिकन संशोधकांनी चुंबकीय, गुरुत्वाकर्षण आणि हायपरस्पेक्ट्रल सर्वेक्षणांच्या माध्यमातून हवाई मिशन चालवले. अफगाणिस्तानमध्ये सापडलेल्या खनिजांमध्ये लोह, तांबे, कोबाल्ट, सोने याशिवाय औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या लिथियम आणि निओबियमचा समावेश आहे.

 Afghanistan Desert
Japan: जपानमध्ये पावसाचा कहर, 3 जणांचा मृत्यू तर 113 लोक बेपत्ता

लिथियममुळे अफगाणिस्तानचे भाग्य बदलू शकते!

अफगाणिस्तानात असलेल्या खनिजांपैकी लिथियमची (lithium) सर्वाधिक मागणी आहे, म्हणूनच अफगाणिस्तानला लिथियमचे 'सौदी अरेबिया' (Saudi Arabia) देखील म्हटले जाते. वास्तविक, लिथियमचा वापर लॅपटॉप, मोबाइल आणि संगणकांच्या बॅटरीमध्ये वापर करण्यात येतो. अमेरिकेच्या संरक्षण विभाग असलेल्या पेंटागॉनने सौदी अरेबियामध्ये अफगाणीस्तानातील लिथियमच्या प्रक्रियेबद्दल बोलले जात होते, असं सांगण्यात आले आहे. हवामान बदलाच्या तोंडावर हे निश्चित आहे की येणाऱ्या काळात जीवाश्म इंधनांच्या जागी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मागणी वाढेल. अशा परिस्थितीत, लिथियम सारख्या खनिजांची मजबूत उपस्थिती अफगाणिस्तानाचे भाग्य बदलू शकते, असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

 Afghanistan Desert
पाकिस्तानचा भारतावर बॉम्ब हल्ल्याचा आरोप

चीनलाही अफगाणिस्तानातील खनिजांची लालसा

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातही निओबियम (Niobium) आढळतो. ही एक मऊ धातू आहे, जी सुपरकंडक्टिंग स्टील बनविण्यासाठी वापरण्यात येतो. बर्‍याच दुर्मिळ खनिजांच्या अस्तित्वामुळे, असा विश्वास व्यक्त करण्यात आहे की, की येणाऱ्या काळात जगभरातील अन्य देश अफगाणिस्तानमधील खनिज संपत्तीच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. आतापर्यंत अमेरिका येथे आहे आणि त्यानंतर आता चीनने देखील प्रवेश केला आहे. म्हणूनच चीनने (China) अफगाणिस्तानात आपला ताबा मजबूत करण्यासाठी 2 अब्ज डॉलर्सच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा भाग म्हणून सीपीसी (चायना पाकिस्तान कॉरिडोर) अफगाणिस्तानापर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com