Taliban criticizes Pakistan's decision to expel Afghan citizens from the country. Dainik Gomantak
ग्लोबल

"हे अन्यायकारक...", अफगान नागरिकांना देशाबाहेर काढण्याचा पाकिस्तानचा निर्णय तालिबानच्या जिव्हारी

Ashutosh Masgaunde

Taliban criticizes Pakistan's decision to expel Afghan citizens from the country:

अफगाणिस्तानचे तालिबान-नियुक्त कार्यवाहक संरक्षण मंत्री मुल्ला मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अफगाण निर्वासितांना हद्दपार करण्याच्या पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे आणि हा निर्णय "अन्यायकारक आणि अयोग्य" असल्याचे म्हटले आहे. अशी बातमी टोलो न्यूजने दिली आहे. टोलो न्यूज हे काबुलमधून प्रसारित होणारे अफगाण वृत्तवाहिनी आहे

काबूलमधील पोलीस अकादमीच्या 14 व्या पदवीदान समारंभात बोलताना मुजाहिद म्हणाले की, या निर्णयामुळे काबूल आणि इस्लामाबादमधील द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचेल.

तालिबानच्या कार्यवाहक मंत्र्याने पाकिस्तानी नागरिक आणि मौलवींना देशातील अफगाण निर्वासितांविरुद्ध अशा "हिंसक" कारवाया थांबविण्याचे आवाहन केले.

यावेळी मुल्ला मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केलेल्या अफगाण गुंतवणूकदारांना, पाकिस्तानातील गुंतवणूक थांबवून अफगाणिस्तानच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांच्या मालमत्तेचा वापर करण्याचे आवाहन केले.

तालिबानचे कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणाले, "हा अन्यायकारक आणि अयोग्य निर्णय आहे. आम्ही पाकिस्तानचे नागरिक, तेथील धार्मिक मौलवी आणि राजकीय नेत्यांना विनंती करतो की, पाकिस्तानातील अफगाण नागरिकांवर अशा प्रकारची दहशत आणि क्रूरता करणाऱ्या या अधिकाऱ्यांना थांबवावे."

दरम्यान, काबूलमधील पोलिस अकादमीच्या 14 व्या पदवीदान समारंभात बोलताना, तालिबान-नियुक्त अफगाणिस्तानचे उप-परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाई यांनी अफगाण निर्वासितांना देशाबाहेर काढण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की, हा निर्णय शेजारी देशांच्या शिष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधी आहे.

यावेळी स्टानिकझाई यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनाही इशारा देत द्विपक्षीय संबंध बिघडू नयेत यासाठी मर्यादेत राहण्याचे आवाहन केले.

"आम्ही आमच्या सुरक्षा आणि आर्थिक समस्या सोडवल्या आहेत आणि आम्हाला या संदर्भात अनुभव आहे आणि जर पाकिस्तानची इच्छा असेल तर आम्ही त्यांना समस्या सोडवण्यासाठी सल्ला देऊ शकतो," असेही स्टानिकझाई पुढे म्हणाले.

पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत अफगाण निर्वासितांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तालिबान आणि अफगाणिस्तानातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT