Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानसाठी मैदानात उतरला पाकिस्तान, पाक हवाई दलाने पंजशीरवर केला बॉम्बहल्ला!

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी आपल्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. अफगाणिस्तानातील सर्व प्रांत तालिबान्यांनी आपल्या ताब्यात घेतले असून मात्र पंजशीर प्रांत अहमद मसूद आणि अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली तालिबान्यांशी दोन हात करत आहेत. यातच आता प्रतिकार शक्तींचा शेवटचा गड असलेल्या पंजशीरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनने बॉम्बहल्ला केला आहे. जिथे तालिबान्यांना (Taliban fighters) स्थानिक बंडखोरांकडून आव्हान दिले जात होते, रविवारी एका अहवालात माजी खासदार झिया अरियनझाद (Zia Aryanzad) यांच्या हवाल्यानुसार पाकिस्तानने (Pakistan) पंजशीरवर बॉम्बहल्ला केला आहे.

तत्पूर्वी रविवारी रात्री तालिबानविरोधातील प्रतिकार चळवळीचे नेतृत्व करणारे अहमद मसूद यांचे प्रवक्ते फहीम दष्टी पंजशीरमध्ये तालिबानशी लढताना मारले गेले. अश्वाका न्यूज एजन्सीने अहवालात म्हटले आहे की, अहमद शाह मसूदचा पुतण्या आणि माजी प्रमुख मुजाहिदीन कमांडर जनरल साहिब अब्दुल वदुद झोरही लढाईत मारले गेले.

पंजशीर खोऱ्यात युद्धबंदीची हाक

त्याच वेळी, नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानच्या (National Resistance Front of Afghanistan) फेसबुक पेजने देखील एक निवेदन दिले, ज्यात म्हटले आहे की, "आम्ही आज तालिबान्यांविरोधात सुरु असलेल्या लढाईमध्ये दोन वीर सेनानी गमावले आहे. अमीर साहिब अहमद मसूद यांच्या कार्यालयाचे प्रमुख फहीम दष्टी आणि फॅसिस्ट गटाविरुद्धच्या लढ्यात अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय नायकाचा पुतण्या जनरल साहब अब्दुल वदुद जोर यांनी पंजशीरसाठी बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही.

दरम्यान, लढाईत त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आल्याने पंजशीर खोऱ्यातील प्रतिरोधक दलाने युद्धबंदीची हाक दिली आहे. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटने तालिबानला पंजशीरमधून माघार घेण्याची ऑफर दिली आहे आणि त्या बदल्यात ते लष्करी कारवाईपासून परावृत्त होतील.

देशात अराजक

हे ज्ञात आहे की, अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी कब्जा केल्यापासून संपूर्ण देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात अमेरिका गेल्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. जगातील देशांमध्ये तालिबानला मान्यता देण्यासाठी मंथन सुरु आहे. दुसरीकडे, दहशतवादी संघटना तालिबान आणि दहशतवादी आश्रयस्थान पाकिस्तान यांच्यातील संबंधांचे पुरावे दिसू लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT