Art Of War: अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीन चांगलाच संतापला आहे. मागील दोन दिवसांपासून चीन अमेरिकेला तैवान मुद्यावरुन युध्दाची धमकी देत आहे. एवढेच नाही तर चीनने तैवानला चारही बाजूनी घेरुन 6 ठिकाणी लष्करी सरावही सुरु केला आहे. चीनच्या या रणनीतीकडे दबाव निर्माण करण्याची निती म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, तैवानला धडा शिकवण्यासाठी चीनकडूनही हल्ला केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु चीनची रणनीती ज्यांना समजते त्यांचा असा विश्वास आहे की, तो सध्या तसे काहीही करणार नाही. याचे कारण चीन सध्या तैवानवर हल्ला करुन बरेच काही साध्य करेल अशा स्थितीत स्वत:ला पाहण्यास असमर्थ आहे. अशा स्थितीत त्यांनी 'आर्ट ऑफ वॉर' अंतर्गत न लढता तैवानला जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
वास्तविक 'आर्ट ऑफ वॉर' हा सन त्झूचा सिद्धांत आहे, ज्याला चिनी लष्करी रणनीतिकार मानतात. या सिध्दांतानुसार, आपण शत्रूशी सामना करण्यासाठी इतकी तयारी केली पाहिजे की, आपल्याला प्रत्यक्षात लढण्याची गरजच पडली नाही पाहिजे. याचा अर्थ प्रतिस्पर्ध्यावर इतका दबाव आणायचा की, त्याने युध्दाला सामोरे न जाता शरणागती पत्करली पाहिजे. चीनच्या या युद्ध रणनीतीवर या 'आर्ट ऑफ वॉर' ची छाप नेहमीच दिसून आली आहे. डोकलाम, लडाख सारख्या भागात सीमेवर अतिक्रमण करुन भारतासोबतचा तणाव अनेक महिने टिकवून ठेवणे आणि त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हा देखील चीनच्या अशाच एका रणनीतीचा भाग आहे.
लडाख आणि दक्षिण चीन समुद्रात चीन हेच करत आहे
याशिवाय दक्षिण चीन समुद्रातही चीन याच रणनीतीचा अवलंब करत आहे. इथे तो जपान, व्हिएतनामसह अनेक देशांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इथे आपण हे समजून घेतले पाहिजे की, या माध्यमातून चीन केवळ दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तर स्पर्धेमध्ये राहून योग्य वेळेची वाट पाहत आहे. 1962 मध्ये भारतावर अचानक हल्ला करुन त्यांनी तेच केले. याशिवाय त्यांनी तिबेटवर अचानक हल्ला करुन तिबेटी नागरिकांचे बंड मोडून काढले.
दबाव आणि तणाव टाळत नाही, तर युद्धाची वाट पाहतोय
चीन (China) आणि तैवानमधील संबंध समजून घेणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ड्रॅगन पुन्हा अशाच रणनीतीचा अवलंब करु शकतो. सध्या अमेरिकेचा वरचष्मा आहे. दुसरीकडे, युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास अमेरिका (America) चीनवर आर्थिक निर्बंध लादू शकतो. चीन तैवान आणि अमेरिका संबंधावरुन धमकी देत राहील, परंतु हल्ला करणार नाही. याशिवाय अमेरिकेन लष्कराच्या तुलनेत चीन खूपच मागे आहे. अशा स्थितीत चीन काही दशकांपर्यंत आपली आर्थिक आणि लष्करी ताकद झपाट्याने वाढवेल, असे मानले जात आहे. युक्रेन युद्धातूनही चीन खूप काही शिकला आहे. त्याला रशियाप्रमाणे तैवानमध्ये अडकायचे नाही. अशा स्थितीत चीन सातत्याने तैवान (Taiwan) आणि अमेरिकेवर दबाव आणत आहे. त्याचबरोबर चीन स्वतःला अशा स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की, अमेरिका तैवानमध्ये ढवळाढवळ करु शकणार नाही. युद्धाच्या 'आर्ट ऑफ वॉर' चे मूळ उद्दिष्ठ युध्दाची केवळ धमकी देत राहणं परंतु कोणत्याही प्रकारची कृती न करणं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.