UN General Assembly Viral Video Syria Leader Phone Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: 'जगाचे नेते भाषण ऐकताहेत, हे साहेब ट्रेंडिंग रिल्स शोधताहेत'! युएन बैठकीतील सीरियाई राष्ट्राध्यक्षांचा भन्नाट टाइमपास व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

UN General Assembly Viral Video Syria Leader Phone: न्यूयार्क येथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक अधिवेशनात एका अत्यंत रंजक आणि अचंबित करणाऱ्या घटनेने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले.

Manish Jadhav

UN General Assembly Viral Video Syria Leader Phone: न्यूयार्क येथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक अधिवेशनात एका अत्यंत रंजक आणि अचंबित करणाऱ्या घटनेने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. जेव्हा जगभरातून जमा झालेले दिग्गज नेते आणि राष्ट्राध्यक्ष अतिशय गंभीर जागतिक मुद्द्यांवर चर्चा करत होते, तेव्हा सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांचे लक्ष त्या महत्त्वाच्या बैठकीत अजिबात नव्हते.

‘कुर्दिस्तान 24’ ने दिलेल्या वृत्तानुसार आणि समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, अल-शारा हे अत्यंत निवांतपणे आपल्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम (Instagram) रील्स पाहताना आणि इतर लोकांना रील्स पाठवताना कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले. ज्यावेळी ते आपल्या मोबाईलमध्ये मग्न होते, त्याचवेळी सभागृहात तुर्किचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन आपले महत्त्वाचे भाषण देत होते.

अहमद अल-शारा हे आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात सहभागी झाले. यापूर्वी 2025 मध्ये त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत जवळपास 60 वर्षांच्या कालावधीनंतर युएनओच्या व्यासपीठावर जागतिक नेत्यांना संबोधित करणारे सीरियाचे पहिले प्रतिनिधी म्हणून मान मिळवला होता. विशेष म्हणजे, त्यांनी यशस्वी नेतृत्व करुन सीरियातील तत्कालीन बशर अल-असद यांचे सरकार उलथवून लावले. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये त्यांनी सीरियाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. असे असतानाही, युनियनच्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या जागतिक व्यासपीठावर मोबाईल वापरत रील्स पाहिल्यामुळे आता त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे.

मंगळवारी पार पडलेल्या वार्षिक युएन जनरल असेंबलीच्या सत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील जवळपास 130 देशांच्या प्रमुखांनी हजेरी लावत आपले विचार मांडले. या भव्य सत्राची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांच्या वार्षिक अहवाल सादर करण्याने झाली, ज्यामध्ये त्यांनी आपले शेवटचे भाषणही दिले. त्यानंतर युएनजीएचे अध्यक्ष खलीलुर रहमान यांनी औपचारिकपणे मुख्य डिबेट सत्राची सुरुवात केली, जो या वार्षिक अधिवेशनाचा अत्यंत मुख्य भाग मानला जातो. या संपूर्ण उच्चस्तरीय आणि गंभीर वातावरणात सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दाखवलेल्या या बेपर्वा आणि मजेशीर प्रकारामुळे सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT