Landslide Dainik Gomantak
ग्लोबल

Landslide: 'या' देशात पावसाचा हाहाकार! भूस्खलनात संपूर्ण गाव जमीनदोस्त; 1000 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

Landslide in Sudan: दारफुर प्रांतातील मर्रा पर्वतांमध्ये झालेल्या एका भीषण भूस्खलनामुळे (लँडस्लाइड) एक अख्खे गाव जमीनदोस्त झाले.

Manish Jadhav

Landslide in Sudan: आफ्रिकेतील सुदान देशात एक मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. दारफुर प्रांतातील मर्रा पर्वतांमध्ये झालेल्या एका भीषण भूस्खलनामुळे (लँडस्लाइड) एक अख्खे गाव जमीनदोस्त झाले. या नैसर्गिक आपत्तीत तब्बल एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतून फक्त एकच व्यक्ती जिवंत वाचली आहे, ज्यामुळे या आपत्तीची तीव्रता किती भयानक आहे हे लक्षात येते.

दरम्यान, ही घटना दारफुरमधील मर्रा पर्वतांमध्ये वसलेल्या तरासिन नावाच्या गावात घडली. या भागावर नियंत्रण असलेल्या विद्रोही गट सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मी (Sudan Liberation Movement-Army) ने सोमवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा या दुर्घटनेची माहिती दिली. या गटाच्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे संपूर्ण गाव गाडले गेले असून, एका व्यक्तीचा अपवाद वगळता गावातील सर्व लोकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. सुदानमध्ये अलीकडच्या काळात घडलेली ही सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.

मुसळधार पाऊस ठरला कारणीभूत

सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या भागात अनेक दिवस मुसळधार पाऊस (Rain) झाला होता. या जोरदार पावसामुळेच जमिनीची भूस्खलन क्षमता कमी झाली आणि रविवार, 31 ऑगस्ट रोजी मर्रा पर्वतांमध्ये भूस्खलनाची ही मोठी घटना घडली. प्रारंभिक अंदाजानुसार, मृतांचा आकडा एक हजार पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. डोंगराच्या मातीचा ढिगारा गावावर कोसळल्याने मृतदेह शोधणे आणि बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.

दुसरीकडे, या भीषण आपत्तीनंतर विद्रोही गटाने संयुक्त राष्ट्र (United Nations) आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत गटांना त्वरित मदत करण्याचे आवाहन केले आहे. भूस्खलनामुळे गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि पीडितांना मदत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढे यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

गृहयुद्धामुळे मदतकार्यात अडथळे

सुदानमध्ये (Sudan) ही नैसर्गिक आपत्ती अशा वेळी आली आहे, जेव्हा देश गेल्या अनेक महिन्यांपासून एका भयानक गृहयुद्धाचा सामना करत आहे. सुदानचे सैन्य आणि पॅरामिलेटरी रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यात एप्रिल 2023 पासून राजधानी खार्तूम आणि देशाच्या इतर अनेक भागांत जोरदार संघर्ष सुरु आहे. या संघर्षामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत आणि देशात आधीच मानवी संकट उभे राहिले आहे.

दुसरीकडे, या गृहयुद्धामुळे दारफुरसारख्या दुर्गम भागात मदतकार्य पोहोचवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकारी यंत्रणा युद्धाच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे आणि मदत पुरवणे जवळजवळ अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय मदतीची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु गृहयुद्धामुळे मदतकार्यांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही दुर्दैवी घटना देशातील राजकीय अस्थिरता आणि नैसर्गिक आपत्ती या दोन्ही संकटांची भयावहता अधोरेखित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

SCROLL FOR NEXT