Sudan Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sudan Crisis: बाजारपेठा अन् बँकांमध्ये लूट सुरु, आतापर्यंत 500 ठार; सुदानचा रक्तरंजित संघर्ष...!

Sudan Crisis: आफ्रिकन देश सुदानमधील रक्तरंजित संघर्ष तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे.

Manish Jadhav

Sudan Crisis: आफ्रिकन देश सुदानमधील रक्तरंजित संघर्ष तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. 15 एप्रिलपासून सुदानी लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्समध्ये युद्ध सुरु झाल्यापासून आतापर्यंत 500 जणंचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर आजतागायत हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने दोन्ही बाजूंकडून गोळीबार केला जात आहे. क्षेपणास्त्र डागली जात आहेत.

दरम्यान, आरएसएफचे नेते जनरल मोहम्मद हमदान डागलो यांनी सांगितले की, 'जोपर्यंत संघर्ष सुरु आहे, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही.'

आपल्यावर सातत्याने गोळीबार होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याचदरम्यान, युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्याचीही बातमी आहे, मात्र असे असूनही युद्ध थांबताना दिसत नाही.

3 हजार भारतीयांना बाहेर काढण्यात आले

हिंसक चकमकीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो नागरिकांना (Citizens) आपला जीव गमवावा लागला आहे, तर हजारो लोक जीव वाचवण्यासाठी पळून गेले आहेत.

याशिवाय, अन्न, पाणी आणि वीज नसल्याने अनेकांना घरात कैद राहावे लागत आहे. त्याचवेळी, ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमधून सुमारे 3 हजार भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

या भागात वाढला हिंसाचार

ज्या भागात हिंसाचाराचा वनवा पेटला आहे, त्यामध्ये राजधानी खार्तूमशिवाय दारफूरचाही समावेश आहे. जिनानी येथे झालेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात बाजारपेठा, गोदामे आणि बँका (Bank) लुटण्यात आल्या.

दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. लोक सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हजारो लोक चाड, इजिप्त आणि दक्षिण सुदान यांसारख्या शेजारच्या देशांमध्ये गेले आहेत.

युद्धबंदी करार होऊनही हिंसाचार थांबत नाही

याआधी, गुरुवारी रात्री उशिरा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी 72 तासांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली होती, मात्र तरीही हिंसाचार सुरुच आहे. हा युद्धविराम करार अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या मदतीने करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT