Sudan Crisis: सुदानमध्ये प्रयोगशाळेवर बंडखोरांचा कब्जा, Germ Bomb ची भीती?

Sudan Crisis 2023: सुदानमधील गृहयुद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश प्रयत्न करत असताना जगभराची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
Sudan Crisis
Sudan CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

Sudan Crisis: सुदानमधील गृहयुद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश प्रयत्न करत असताना जगभराची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

सुदानमधील खार्टुम या शहरातील प्रयोगशाळेवर सुरक्षा दलांनी कब्जा केला आहे. या घटनेवर जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. ही प्रयोगशाळा सुदानसाठी ‘जर्म बॉम्ब’देखील ठरु शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सुदानमध्ये लष्कराचा प्रमुख जनरल अब्देल फताह बुऱ्हाण आणि धडक कृती दलाचा प्रमुख मोहम्मद हमदन डागालो (हेमेती) यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

बुऱ्हाणच्या नेतृत्वाखाली तीन लाखांचे लष्कर असून हेमेतीकडे एक लाख निमलष्करी दल आहे. खार्टुममध्ये सरकारी प्रयोगशाळा असून या प्रयोगशाळेवर कब्जा करण्यात आला आहे.

कब्जा नेमका कोणी केलाय याबाबत संभ्रम आहे. सीएनएन या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने हेमेतीच्या निमलष्करी दलाने इमारतीला ताब्यात घेतल्याचं म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांना (Employees) प्रयोगशाळेत प्रवेशबंदी करण्यात आल्याचे वृत्तात म्हटलं आहे.

Sudan Crisis
Sudan Crisis: सोन्याच्या खाणी सुदानसाठी ठरल्या अभिशाप, दोन जनरल समोरासमोर; वाचा गृहयुद्धाची संपूर्ण कहाणी

लॅबमध्ये नेमके काय?

लॅबमध्ये गंभीर आजारांचे नमुने आहेत. या प्रयोगशाळेत लष्करी कारवाई झाल्यास ही प्रयोगशाळा स्थानिकांच्या जिवावर बेतू शकते.

प्रयोगशाळेतील एका इमारतीमधील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. ही गंभीर बाब असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटनांनी तातडीने यात हस्तक्षेप करावा, असं सुदानमधील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सीएनएनला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Sudan Crisis
Sudan Crisis: लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्समध्ये सत्ता संघर्ष, 30 ठार, 400 जण जखमी; भारतीयांसाठी...

Germ Bomb म्हणजे काय?

Germ Bomb हे जैविक शस्त्र आहे. संसर्गजन्य आजार पसरवण्यासाठी दहशतवादी संघटना किंवा शत्रूराष्ट्राकडून याचा वापर होण्याची शक्यता असते. प्राचीन काळातही जैविक शस्त्रांचा उल्लेख आढळतो.

जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटलंय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थानिक प्रतिनिधींनी या घटनाक्रमाबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रयोगशाळेतील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

याचा फटका आजारांच्या नमुन्यांवर बसू शकतो. याशिवाय हे नमुने विध्वंसक संघटनांच्या हाती लागल्यावर त्याचा वापर शस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो, असं WHO चं म्हणणं आहे. वीज पुरवठा खंडीत केल्याने प्रयोगशाळेतील रक्तपेढीवरही परिणाम झाल्याचे स्थानिक सांगतात.

Sudan Crisis
Sudan: दारफुरमध्ये जातीय हिंसाचार, 100 जणांचा मृत्यू; 20 हून अधिक गावात भीषण आग

प्रयोगशाळा ताब्यात घेणं धोकादायक का?

प्रयोगशाळा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. सुदानमधील (Sudan) गृहयुद्धानंतर हजारो जण मायदेशी परतले आहेत. पण स्थानिक मात्र अद्याप तिथेच आहेत. सुदानमध्ये आठ लाख निर्वासित राहतात. या युद्धाचा फटका त्यांनाही बसला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com