Sudan Civil War सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल आरएसएफ यांच्यात संघर्ष सुरू आहे. सुदानमधील दारफुर येथे शनिवारी रात्री झालेल्या रॉकेट हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, लष्कर आणि निमलष्करी दलांच्या लढाईत दोन्ही बाजूंनी रॉकेटचा वर्षाव करण्यात आला.
अल जझीराच्या वृत्तानुसार, लष्कर आणि आरएसएफ यांच्यातील संघर्षामुळे हजारो लोक पश्चिम दारफुरमधून स्थलांतर करत आहेत. अनेक नागरिक शेजारील चाडच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
स्निपर हल्ल्यात एक जण ठार झाला आहे असा दारफुर बार असोसिएशनने दावा केला आहे. एक आठवड्यापूर्वी सुदानच्या ओमदुरमन शहराच्या निवासी भागात झालेल्या हवाई हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले होते.
दारफूरचे इतर भागात युद्धाची झळ पोहोचल्यास मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता असोसिएशनने व्यक्त केली आहे. सुदानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो. अशी काळजी युनायटेड नेशन्सने व्यक्त केली आहे.
सुदानची राजधानी खार्तूममध्ये सुदानी सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात 15 एप्रिल रोजी युद्ध सुरू झाले. महिन्याच्या शेवटी दारफुरमध्ये पसरले आणि संपूर्ण सुदानमध्ये सुमारे 3,000 लोक मारले गेले आहेत.
सुदानमध्ये देशाची सत्ता काबीज करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष सुरू आहे. सुदानचे लष्कराचे नेते अब्देल फताह अल-बुरहान आणि निमलष्करी दलाचे आरएसएफ कमांडर मोहम्मद हमदान डगालो देशाला धोका निर्माण करत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.