Gabriel Boric Dainik Gomantak
ग्लोबल

Chile: विद्यार्थी नेते ‘गेब्रियल बोरिक’ बनले चिलीचे सर्वात तरुण राष्ट्रपती

दैनिक गोमन्तक

डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेले विद्यार्थी नेते गॅब्रिएल बोरिक (Gabriel Boric) यांनी शुक्रवारी चिलीचे (Chile) नवे अध्यक्ष (President of Chile) म्हणून शपथ घेतली आहे. तुलनेने वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था असूनही, अलिकडच्या वर्षांत देशातील वाढत्या असमानतेवर वारंवार भाष्य करणाऱ्या बोरिकने राजकीय आणि आर्थिक सुधारणांचे वचन दिले आहे. बोरिक (36) हे दक्षिण अमेरिकन राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत. (Student leader Gabriel Boric became Chile's youngest president)

दरम्यान, आधुनिक चिलीची पायाभरणी करणाऱ्या 17 वर्षांच्या लष्करी हुकूमशाहीनंतर देशात लोकशाही पुनर्संचयित झाली तेव्हा तो फक्त चार वर्षांचा होता. बोरिक यांनी वचन दिले आहे की, आम्ही 1973 ते 1990 या काळात जनरल ऑगस्टो पिनोशे यांच्या राजवटीत लागू करण्यात आलेल्या मुक्त बाजार मॉडेलमधून उदयास आलेली गरीबी आणि असमानता दूर करणार आहोत. त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ अशा वेळी सुरु होत आहे की, जेव्हा संविधान सभा पिनोशे यांच्या राजवटीत लागू केलेले संविधान बदलून देशासाठी नवीन संविधान तयार करत आहे.

मंत्रिमंडळात पुरुषांपेक्षा महिला अधिक

सिनेट सोशालिस्ट पार्टीचे नेते अल्वारो एलिजाल्डे यांनी वल्पराइसो या शहरातील संसद भवनात एका समारंभादरम्यान बोरिक यांच्या खांद्यावर राष्ट्रपती प्रतीक लावले. त्यानंतर बोरिक यांनी कॅबिनेट नेता म्हणून शपथ घेतली. बोरिक यांच्या मंत्रिमंडळात 14 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत बोरिक यांना पुराणमतवादी जोस अँटोनियो कास्ट यांच्या विरोधात 56 टक्के मते मिळाली.

बदलासाठी आवाहन केले

"आम्हाला टप्प्याटप्प्याने बदल करावे लागतील कारण आम्ही तसे न केल्यास, अधोगतीकडे जाण्याचा धोका खूप जास्त आहे," असं त्यांनी म्हटले होते. चिलीला लॅटिन अमेरिकेतील आर्थिक सफलता लाभलेला देश म्हणून पाहिले जात आहे. परंतु गेल्या दशकात अनेक मोठ्या विरोधांना वारंवार सामोरे जावे लागले आहे, काहींनी बोरिकच्या नेतृत्वाखाली चांगले शिक्षण, निवृत्तीवेतन आणि आरोग्य सेवा तसेच संपत्तीच्या अधिक समतावादी वितरणाची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: इडीसीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री,इतर संचालकांचीही नेमणूक!

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थिनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT