Love Story Dainik Gomantak
ग्लोबल

22 वर्षीय विद्यार्थ्याचे गुडघ्याला बाशिंगं; 48 वर्षीय शिक्षिकेच्या पडला प्रेमात आणि...

ही एक अशा कपलची लव्ह स्टोरी आहे जी सोशल मीडियावर चागलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

दैनिक गोमन्तक

Love Story: ही एक अशा कपलची लव्ह स्टोरी आहे जी सोशल मीडियावर चागलीच चर्चेचा विषय झाली आहे. त्यांच्या वयात 26 वर्षांचे अंतर आहे. त्या मुलाचे वय 22 वर्षे असून त्याची पत्नी 48 वर्षांची आहे. जी पूर्वी त्याची शिक्षिका होती. त्यांची भेट शाळेतच झाली होती. यानंतर तरुणाने आपल्या शिक्षिकेला प्रपोज केले. ही घटना मलेशियाची आहे. 

मलेशियन न्यूज वेबसाईट न्यू स्ट्रेट टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, मुहम्मद दानियल अहमद अली असे तरुणाचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नीचे नाव जमीला मोहम्मद आहे. 2016 मध्ये, दानियाल ज्युनियर हायस्कूलमध्ये ती मलय भाषा (Malay Language) शिकवत असे.

तेव्हापासूनच दानियलला जमीलाचा स्वभाव खूप आवडत होता. विशेषतः विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची पद्धत. पण दानियाल पुढच्या वर्गात गेल्यावर जमीलाशी त्याचा संपर्क तुटला. पण नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणले. शाळेतच दोघांमध्ये हाय-हॅलो होऊ लागले. हाच तो काळ होता जेव्हा दानियल त्याच्या शिक्षिका जमीलाच्या प्रेमात पडु लागला होता. 

एके दिवशी जमीलाने दानियलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मॅसेज पाठवला. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. बोलत असताना दानियलने जमीलाला प्रपोज केले. मात्र जमीला यांनी हा प्रस्ताव फेटाळला. कारण, दानियल त्याच्यापेक्षा खूपच लहान होता. तसेच ती त्याची शिक्षिकाही होती. मात्र, दानियाल जमीलाला समजवण्याचा प्रयत्न करत राहिला. 

  • असे केले प्रेम व्यक्त

दानियालने जमीलाच्या घराचा शोध घेण्यास सुरूवात केली. घर मिळताच तो तिला भेटायला त्याच्या घरी पोहोचला आणि पुन्हा आपल्या मनाची गोष्ट सांगितली. दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला. अखेरीस, जमीला धीर धरते आणि दानियलच्या प्रेमाचा स्वीकार करते. काही दिवसांनी दोघांनी देखील आपापल्या घरच्यांची परवानगी घेऊन लग्न केले. 

22 वर्षीय दानियालने 2021 मध्ये आपल्या 48 वर्षीय शिक्षिकेसह लग्नबंधनात अडकले. कोटा टिंगी शहरातील एका मशिदीत त्यांचा विवाह पार पडला. त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. आपल्यापेक्षा वयाने मोठी असूनही लहान वयात पत्नी मिळाल्याबद्दल डॅनियल स्वतःला भाग्यवान समजतो. 

रिपोर्टनुसार, जमीला 2007 मध्ये पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होती. 2021 मध्ये तिच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला, जेव्हा तिने दानियालशी लग्न केले. सध्या हे जोडपे आनंदाने आपले आयुष्य जगत आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

SCROLL FOR NEXT