Canada Dainik Gomantak
ग्लोबल

Canada: कॅनडात पंजाबींचे 'बल्ले-बल्ले'! दक्षिण आशियाई भाषा बोलणाऱ्यांचा वरचष्मा

Canada: कॅनडामध्ये भारतीय भाषा बोलणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

Canada: कॅनडामध्ये भारतीय भाषा बोलणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा पुरावा स्टॅटिस्टिक्स कॅनडाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून मिळतो. बुधवारी समोर आलेल्या अहवालात पंजाबी ही कॅनडातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय हिंदी, मल्याळमसह अनेक भाषा बोलणाऱ्यांची संख्याही देशात झपाट्याने वाढली आहे.

दरम्यान, आकडेवारी दर्शवते की, कॅनडामध्ये (Canada) पंजाबी भाषा बोलणाऱ्यांची गेल्या 5 वर्षांत 49% वाढ झाली आहे. देशातील दोन अधिकृत भाषा म्हणजे इंग्रजी (English) आणि फ्रेंच नंतर मँडरीन (Mandarin) आणि पंजाबी या सर्वात जास्त बोलल्या जातात. इथे सुमारे 5.3 लाख लोक मॅंडरिन भाषा बोलतात. त्याचवेळी, 5.2 लाख पंजाबी भाषिक आहेत.

आकडेवारीनुसार, पंजाबी भाषा चौथ्या स्थानावर आहे. 2016 ते 2021 दरम्यान, मॅंडरीन भाषा बोलणाऱ्यांची संख्या 15 टक्क्यांनी वाढली आहे. तर पंजाबींच्या बाबतीत ही संख्या 49 टक्के आहे. पंजाबी बोलणाऱ्यांची संख्या सरासरी 5.2 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमध्ये इमिग्रेशनचा (Immigration) मोठा वाटा आहे.

दुसरीकडे, घरांमध्ये दक्षिण आशियाई भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार मल्याळम भाषिकांमध्ये 129 टक्के, हिंदी 66 टक्के, पंजाबी 49 टक्के आणि गुजराती 43 टक्के वाढ झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे की, कोरोना (Corona) काळातही कॅनडात स्थलांतरितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT